ब्युरोचीफ प्रशांत शाहा
गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील नवीन महामंळाचे गोडाऊन मधून मागील वर्षी खरेदी केलेल्या धानाची उचल केल्या जात आहे. गोडाऊन कडे जाणार मार्ग मुरुमाचा असल्याने व यावर्षी अतिवृष्टी झाल्याने मार्ग नाहीसा झाला असताना सुद्धा या मार्गावरून धानाने भरलेली जड वाहने नेण्यात येत आहे. धान नेणारे वाहन फसत आहेत
तरी सुद्धा महामंडळ या मार्गावरून धान भरलेले वाहन नेत आहेत.मागील महिनाभरात सुमारे चार ते पाच धानाची ट्रक फसले होते तरी सुद्धा महामंडळानी आपल्या जोरावर येथून वाहने नेणा सुरू ठेवले.
मात्र वॉर्ड नंबर तीन येथील महिला आत्ता रस्त्यावर उतरले व वाहन धारकांना वाहन नेण्यास मनाई केले आहेत
अगोदर आमचा रस्ता बनवा तेव्हाच तुम्ही वाहने न्या असे नाही केल्यास आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असे महिला बोलत आहेत.तरी वरिष्ठांनी या मार्गाचे दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मांगनी रेगडी येथील वॉर्ड नंबर तीन मधील नागरिकांन कडून केली जात आहे