घरकुल लाभार्थ्यांचा अनुदान लवकर जमा करा- टायगर ग्रुप.. आमदार व मुख्याधिकाऱ्याकडे निवेदन…

1031

देसाईगंज : माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. यापैकी निवारा या गरजेची पूर्तता करण्यासाठी शासनाने पंतप्रधान आवास योजना २०१५ पासून सुरू केली. व त्यातून बेघर लोकांना घर बांधणीसाठी मदत होते. परंतु देसाईगंज शहरात लाभार्थ्यांना देखील २०२० पासून या योजनेचे संपुर्ण निधी अद्याप न मिळाल्याने काही लोकांचे घर उघड्या वर आहेत. तर काहीनी कर्ज काढून घर बनविलेले आहेत. उघडयावरचे संसार पावसाळ्यात सरपटणारे विषारी प्राण्यांपासून व अतिपावसामूळे जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. ज्यांनी कर्ज काढून घर बनविलेले त्याचे दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहेत.

लोकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तरी यांची जाणीव प्रशासनाने ठेवून रखडलेल्या संपूर्ण निधी लाभार्थ्यांना तात्काळ मिळावा असे निवेदन टायगर ग्रुप नैनपूर शाखेने आमदार कृष्णा गजबे व न.प.देसाईगंज मुख्याधिकारी आश्रमा यांच्या कडे दिले. लवकरात लवकर हे लाभार्थ्यांना त्याचा अनुदान दिले जाईल असे आश्वासन दिले. त्यावेळी शाखेचे प्रमुख सचिन आठवले, चेतन राऊत, मंगेश मुळे, वैष्णव बागमारे, श्रीकांत बेदरे, दीपक मुळे, अंकित नाकतोडे, गोलू भुते व अनेक युवक उपस्थित होते….