Homeगडचिरोलीशस्त्रक्रियेसाठी माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवारांपुढे भिक्षापात्र घेऊन लोटांगण घालणारा गौतम गेडाम याची...

शस्त्रक्रियेसाठी माजी मंत्री आ.विजय वडेट्टीवारांपुढे भिक्षापात्र घेऊन लोटांगण घालणारा गौतम गेडाम याची ओळख.. उपकाराची जरा जाण ठेवायची होती रे गौतमा..

गडचिरोली : महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच कोरोना या वैश्विक महामारीने मृत्यूचे तांडव माजविले. अशातच आपत्ती व्यवस्थापन खात्याची धुरा विदर्भातील काँग्रेसचे धडाडीचे नेते माजी कॅबिनेट मंत्री तथा आ. मान. श्री. विजय वडेट्टीवार यांचेकडे सोपविण्यात आली. राज्यातील जनतेला मृत्यूच्या दाढेतून वाचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आरोग्यमंत्र्याच्या खांद्याला खांदा लावून मृत्युसंकटाशी समर्थपणे लढा दिला.

तर सत्ता परिवर्तनानंतर गेल्या पंधरवाड्यात अतिवृष्टीमुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थितीचे संकट निर्माण झाले. सत्तेची खुर्ची दुरावली असतानाही एक खरा जनसेवक म्हणून मा. आ. विजय भाऊंनी जनसेवेचे व्रत कायम ठेवत राज्याच्या शेवटच्या टोकावरील चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्याच्या पूर परिस्थितीमुळे आपत्तीग्रस्त तालुक्यात भेटी देऊन पूरग्रस्त नागरिकांना मायेचा आधार दिला. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात राज्याच्या सीमावरती भागातील नागरिकांनी अक्षरशा घर दारू सोडून चक्क राष्ट्रीय महामार्गावर अन्न पाण्याविना व्याकुळलेल्या अवस्थेत प्रशासनाने झुगारून दिले असताना केवळ आ. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून औदार्य दाखवले. एक झुंजारू, लढाऊ, विकसनशील दृष्टिकोन व गोरगरिबांची व्यथा जाणणारा नेता म्हणून काँग्रेस पक्षात आदरणीय आ.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांची ओळख आहे. असे असताना मागील काळात चंद्रपूर शहरातील साप्ताहिक विचारपीठ या वेब पोर्टलचे संपादक पत्रकार गौतम गेडाम नामक व्यक्तीला दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यावेळेस माजी पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांनी आर्थिक मदत करून प्राण वाचविले हे विशेष. परंतु खाल्ल्या मिठाला जागायाच… असा आजचा काळ राहिलेला नाही. असेच काही आजच्या कलियुगीन पत्रकाराचे वास्तव्यरूप असल्याची अनुभूती साप्ताहिक विचार पिठाच्याच संपादक गौतम गेडाम याच्या आकस बुद्धी व खंडणीखोरी विचारधारेच्या लेखणीतून पहावयास मिळाली.

साप्ताहिक विचारपीठ या वेब पोर्टलवर गौतम गेडाम या ब्लॅकमेलर खंडणी बहाद्दर संपादकाने राजकीय वैमनस्य विचारधारेच्या पूढार्‍यांकडून बदनामीची सुपारी घेऊन स्वच्छ प्रतिमेच्या लोकनेते व लोकप्रतिनिधींवर ताशेरे ओढून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा अयशस्वी प्रयत्न चालविला आहे. यात साप्ताहिक विचार पिठाच्या आजच्या मजकुरात माननीय श्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे च्या कोट्यात मतदान केलेले नाही. तसेच विधानसभेतील बहुमत चाचणी दरम्यान हेतू पुरस्सर गैरहजेरी व उर्वरित सात आमदारांसह माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ.श्री विजय वडेट्टीवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचे कुठलाही अधिकृत आधार नसताना सूचक वृत्त प्रकाशित केले. राजकारणाचा तीळ मात्र गंध नसलेला व राजकीय वस्तुस्थितीचा कवडीमोल अभ्यास नसलेला व होत्याचे नव्हते असा विपर्यास करणारा गौतम गेडाम हा कितपत विद्वान आहे हे त्याच्या लेखणीतूनच लक्षात येते.

माजी मंत्री, काँग्रेस नेते आ.श्री. विजय वडेट्टीवार यांचे मत हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस विद्यमान विधान परिषद आ. भाई जगताप यांच्या कोट्यात होते व त्यांच्या मतदान कोट्यातील एकही मत फुटले नाही हे विशेष. तर बहुमत चाचणी दरम्यान मुंबई शहरातील वाहतुकीचा खोळंबा तसेच विधानभवनात पोहोचताच हेतू पुरस्सर पणे विरोधी पक्षातील आमदारांना सभागृहात न येऊ देण्यासाठी भाजपने आखलेला बेत यामुळे विधानभवनाची दार काही मिनिट अगोदरच बंद करण्यात आली होती.असे सर्व जनतेसमोरच अगोदरच स्पष्ट झाले होते. तसेच निवडणूक प्रक्रिये दरम्यान विरोधात मतदान करणाऱ्या महाविकास आघाडीतील त्या “सात’ आमदारांची नावे ही पक्षश्रेष्ठींना पुरेपूर माहिती असून त्यांचे सोबत माजी मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांचे नाव जोडणे हे एक प्रकारचे राजकिय षडयंत्रच आहे. ह्या सर्व प्रक्रिया राज्यस्तरावरील राजकारणाच्या निगडित असताना केवळ नको त्या विषयात नाक खूपसणारा एक माथे फीरू स्वयंघोषित विचारपीठ लेखक गौतम गेडाम याने स्थानिक जिल्हा पातळीवर नव्हत्या चा होता असा विषय रंगविण्यामागे विरोधातील कुणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय असला प्रकार होणे फार कठीणच आहे. कधीकाळी भिक्षापात्र घेऊन माजी मंत्री ,आ. वडेट्टीवारांच्या दारात शस्त्रक्रियेसाठी लोटांगण घालणारा गौतम गेडाम केलेल्या उपकाराची जाण विसरून चक्क नवजीवन देणाऱ्या जीवनदात्यावरच चिखल फेक करेल असे वाटले नव्हते. कलियुगात सत्य लिहिणारे व उपकाराची जाण ठेवणारे प्रामाणिक लोक अनेक आहेत. मात्र पत्रकारितेतील काही अपवादात्मक गौतम गेडाम सारखे भाडोत्री ,खंडणी बहाद्दर, व तोकड्या आर्थिक उन्नतीसाठी राजकीय कारकिर्दीची बदनामीची सुपारी घेणारे लोक आज लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेची प्रतिमा मलीन करीत आहे. याची गंभीर दखल प्रामाणिक पत्रकारांनी घेणे गरजेचे असून अशा पत्रकारितेच्या स्वच्छ प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या गौतम गेडाम नामक पत्रकाराला पत्रकारिता क्षेत्रातून हद्दपार करणे काळाची गरज ठरली आहे. सोशल मीडिया, प्रसार माध्यमे यातून निराधार वृत्त प्रकाशित करून आपली दुकानदारी चालवणाऱ्या स्वयंघोषित पत्रकारांवर कायदेशीर कारवाई करून कठोर कायदा आणून कारवाई करणेही काळाची गरजेची आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!