गाय बेलाच्या तस्करीत दोन पोलीसही अडकले.

703

चक्रधर मेश्राम सहसंपादक

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील इतरत्र ग्रामीण भागातून गाय -बैलांची तस्करी ट्रक, व मेट्याडोर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू असून, ही तस्करी पहाटे तीनच्या सुमारास करीत असताना,
शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तस्करांचा पाठलाग करून तस्करांची तक्रार गडचिरोली पोलिसांनी दिली. परंतु गडचिरोली पोलीस स्टेशन चे दोन जबाबदार पोलिस ,एका अज्ञान व्यक्तीच्या मध्यस्तीच्या माध्यमातून तस्करांची पाठराखण करून त्यांना फरार करायला लावले. अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.

तस्करांना मदत करणाऱ्या सबंधित दोन पोलीसांची चोकशी व कारवाहीची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे व सबंधित पोलिसांची तक्रारही पोलिस अधीक्षक यांच्या कडेही देण्यात आली.