अर्थ फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर… विविध सामजिक संघटना चा संयुक्त पुढाकार

0
56

दिपक साबने,जिवती

जिवती: अर्थ फाउंडेशन च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभाग रक्तपेढी विभाग चंद्रपूर, पंचायत समिती जिवती , प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती , गुरुदेव सेवा मंडळ , ग्राम आरोग्य सेना फाउंडेशन कोलाम विकास फाउंडेशन, रुद्र प्रतिष्ठान , गोर सेना , लहुजी ब्रिगेड , संभाजी ब्रिगेड , हजरत टिपू सुलतान फाउंडेशन, चर्मकार महासंघ जिवती , शासनमान्य पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र, ग्रामीण पत्रकार संघ, पोलीस विभाग जिवती, कृषी विभाग व तालुक्यातील विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा आरोग्य विभाग पंचायत समिती जिवती प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने काल दिनांक ०७ ऑक्टोबर २०२१ ला पंचायत समिती, जिवती येथील सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

यामध्ये तालुक्यातील विविध कर्मचारी युवावर्ग तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सभापती, अंजना पवार, पं. स.जिवती यांच्या हस्ते करण्यात आले. महेश भाऊ देवकते उपसभापती, पं. स. जिवती यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला. तसेच प्रमुख अतिथी deputy CEO खावरडे सर , संवर्ग विकास अधिकारी पेंदाम सर,पं. स.जिवती, तहसीलदार गांगुर्डे साहेब , सुभाष भाऊ राठोड, अशपाक भाई , डॉ अंकुश गोतावळे, डॉ आहेरकर सर, डॉ कुलभूषण मोरे ,जाधव सर सीडीपीओ , हरिभाऊ मोरे माजी सभापती , राजेंद्र परतेकी सर , भीमराव पवार सरपंच , विजय भाऊ गोतावळे ,सुनील जाधव सर ,दीपक गोतावळे सर , राजेश भाऊ राठोड , जीवन तोगरे तसेच पंचायत समिती आणि तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर संभाजी ढगे यांनी केले तर प्रास्ताविक अर्थ चे संचालक डॉ.कुलभूषण मोरे यांनी केली. या प्रसंगी अर्थ फाउंडेशन सन २०१४ पासून जिवती सारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य सेवेच्या कार्य बद्दल माहिती दिली ….मोफत आरोग्य शिबीर ,कुपोषित बालकांसाठी आरोग्य शिबिर, महिलांसाठी मासिक पाळी जन जागृती अभियान , मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर , दरवर्षी रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम अर्थ फाउंडेशन सात वर्षापासून राबवत आहे असे यावेळी सांगितले . कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करन्या करीता रुग्नसेवक जीवन तोगरे , शीलवंत गायकवाड , भारत बिरादर , चंदू जाधव एव्हरेस्टवीर विकास सोयाम, विजय मेंढी , नामदेव नागोस यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाकरिता रक्तदात्यांना अशपाक भाई शेख यांच्याकडून फळवाटप करण्यात आले , तसेच चहा पाण्याची व्यवस्था राजू बेल्लाळे यांच्या तर्फे करण्यात आली होती.. या कार्यक्रमात जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा राजेंद्र प्रत्येकी सर यांचे तसेच आतापर्यंत ३० वेळा रक्तदान करणारे मा विजय भाऊ गोतावळे आणि तालुक्यातील गोरगरिबांना मदत करणारे रुग्णसेवक जीवन तोगरे यांचे पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here