तलावात पोहायला गेलेला तरूण बुडाला…

0
90

गोंडपिपरी:गोंडपिपरी येथील वनविभागाच्या डेपोलगत असलेल्या तलावात पोहण्यासाठी उतरलेला 23 वर्षीय तरूण पाण्यात बुडाला.उपस्थीतांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.पण तो निष्फळ.ठरला.

आज पहाटेच्या सुमारास हि घटना घडली.शुभम वामन सातपुते असे तरूणाचे नाव असून तो येथील भगतसिंग चौकातील रहिवाशी होता.

गोंडपिपरी येथील तलावात पहाटे अनेक जण पोहायला जातात.शुभम देखील कधीकधी पोहायला जायचा.पोहण्यात तो तरबेज नव्हता.बिसरेलीच्या बाँटलाच्या सहायाने तो पोहत होता.अशातच तो तलावात बुडाला.यावेळी साठ ते सत्तर लोक तलावात पोहत होते.त्यांच्या लक्षात हि बाब येताच त्यांनी बचावासाठी प्रयत्न केले.पण तोपर्यत उशीर झाला.सध्या पोलीस शुभमच्या मृतदेहाचा शोध घेत आहे.
शुभम हा आरएसएस च्या शारिरीक शाखेचा तालुका प्रमुख होता.
एका युवा तरुणाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here