बसमध्ये चढत असताना चाकाखाली येऊन महिला जख्मी. ? वाहक आणि चालक भानावर राहतात?? बसही खूप वेगात चालत असल्याच्या तक्रारी.

0
275

चक्रधर मेश्राम (सहसंपादक)

गडचिरोली चक्रधर मेश्राम :-गडचिरोली शहरातील कॉम्प्लेक्स परिसरातून गडचिरोली शहराकडे येणाऱ्या एका एस. टी. महामंडळाच्या बसमध्ये एक महिला प्रवासी आपल्या लहान मुलासह चढत असताना महिला कंडक्टर ने अचानक पणे बसची बेल मारल्यामुळे ड्रायव्हरने गाडी समोर घेतली असता, दार बंद न झाल्याने महिला दारातच लटकत फरफडत गेली , काही प्रवाश्यांनी बस थांबवण्या करीता आवाज मारले असता, काही अंतरावर जाऊन चालकाने ब्रेक मारत असताना महिला एसटीच्या चाकाखाली दबलेली होती.

बस मध्ये प्रवासी चढत असताना संपूर्णपणे प्रवासी चढून झाल्यानंतर दरवाजा बंद केल्यावर बेल मारण्याची पद्धत असताना सुद्धा, घाईगडबडीने बस च्या महिला कंडक्टर ने बेल मारल्यामुळे महिलेच्या जीवावर मोठे संकट आले आहे. त्यावेळी वाहन चालकाने सुध्दा याकडे लक्ष दिले नाही.

सदर घटना घडल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठन पंचनामा करून लगेच एसटी बसच्या चालक आशिष वामन सोनवणे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. असून,बस च्या महिला वाहक पुष्पा भानारकर यांचे वर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष…
सदर घटनेची माहिती पोलिस सूत्रांकडून जाणून घेतली असता सदर बस ही चंद्रपूर डेपो ची असून अपघात काल दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडलेली आहे. जखमी झालेल्या महिलेचे नाव वंदना विलास सहारे वय ३० वर्ष राहणार पारडी असून तिला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असताना, प्राथमिक उपचार दिल्यानंतर अचानक पणे प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहे .पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहे. या घटनेनंतर महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस काय कार्यवाही करण्यात यशस्वी होतात याकडे शहरात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला ऊत आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here