दारू बंदी जिल्ह्यात अवैध दारुची वाहतूक.चार चाकी आणि दुचाकी वाहनांसह १३९९ निपा दारुसाठा जप्त करण्यात गडचिरोली पोलीसांना यश.

0
265

चक्रधर मेश्राम(सहसंपादक)

गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यात शासनाने दारुबंदी केली असली तरी पुर्वीपासून अवैध दारू विक्री च्या व्यवसाय करणारे धुरंधर विक्रेते आजही आपला व्यवसाय करण्यात मशहूर आहेत.

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरून अवैध मार्गाने दारू वाहतूक करणाऱ्या लोकांवर गडचिरोली पोलिस विभागातर्फे नियमित पणे कठोर कार्यवाही केली जाते. परंतु कारवाही होत असताना सुध्दा अवैध मार्गाने दारू विक्रेते नवनवीन युक्त्या लढवून,दु – चाकी, आणि चारचाकी वाहनांचा वापर करून दारू आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गेल्या २४ तासातच गडचिरोली तालुक्यातील गोपनीय माहिती देणाऱ्या खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने, कोटगल, पारडी, मोहझरी या गावातून ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एक चारचाकी , दोन दुचाकी वाहनांसह ५ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलीसांनी यश मिळवले आहे.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक स्वप्नील गोपाले,श्रीराम करकाडे,प्रमोद वाळके,खुशाल कोसनकर,ओमकांत पवार,धनंजय चौधरी,देवानंद कोठारे,शकील सय्यद,संतोष मारस्कोल्हे यांनी पार पाडली.

गडचिरोली पोलिस स्टेशन अंतर्गत कुठेही अवैध दारू विक्री,जुगार, सट्टा पट्टी, मटका सुरू असल्याचे आढळल्यास गोपनीय माहिती पोलिस ठाण्यात टेलिफोन क्र.०७१३२/२९५३३४ या नंबर वर देण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here