स्त्री ही स्त्रीची दुश्मन असल्याने अजूनही स्त्री मुक्ती शक्य झाली नाही.पती, सासूनेच सुनेला पेटविले…?

0
309

चक्रधर मेश्राम (सहसंपादक)

गडचिरोली :जन्म देऊन जगाचं दर्शन घडवून आणणारी पहिला गुरु माय असते. माय शिकविते घास भरवुन, डोके – पाठीवर हात फिरवून, छाती पोठा्शी गोंजारुन. अवैज्ञानिक संस्काराची राजवट झाली की. खुप काही बिघडून जाते. असाच प्रकार गडचिरोली जिल्ह्यात घडलेला आहे.

गडचिरोली शहरापासून अवघ्या १५ की.मी. अंतरावर असलेल्या पोर्ला या गावात एका महिलेला , तिच्या नवऱ्याने आई आणि बहिणी च्या मदतीने रॉकेल टाकून पेटविल्याची घटना काल रात्री ९ वाजता च्या सुमारास घडली.
सदर घटनेची माहिती गावच्या काही लोकांनी पोलिस ठाण्यात दिली असता लगेच कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी घटनास्थळी येऊन जळलेल्या महिलेला ताबडतोब सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरिता तिला नागपूर मेडिकल मध्ये पाठविण्यात आले आहे. सदर जळलेल्या महिलेला पोलिसांनी विचारणा केली असता , नवऱ्याने, सासूने, ननदेने रॉकेल टाकून जाळले असेही आपल्या बायानात सांगितले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

पीडित महिलेच्या बयानावरून जिवे मारणे, हुंडा आणण्यासाठी त्रास देणे ह्या आरोपाखाली पती,सासू, आणि ननंदे विरूध्द भा. द. वी.३०७,४९८,३५ या कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here