प्रेम संबंधाच्या वादातून मुलीच्या आजोबावर प्रियकराने केला कुऱ्हाडी ने हल्ला… भा. द. वि. 307 कलमानुसार गुन्हा दाखल.

689

गडचिरोली शहरापासून अवघ्या दहा कि. मी.अंतरावर बोदली टोला या परिसरात एका 24 वर्षीय व्यक्तीने आपल्या प्रेम प्रकरणातून मुलीच्या आजोबाशी वाद घालत कुऱ्हाडी ने डोक्यावर मारून जख्मी केल्याची घटना आज दुपारी घडली .
सदर घटनेची माहिती मिळताच ताबडतोब गडचिरोली पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहोचले होते.त्यानंतर लगेच घटनास्थळ पंचनामा करून आरोपी राजेंद्र अरुण वासेकर वय 24 वर्ष याला ताब्यात घेऊन, जख्मी खुशाल बेंडुजी कुकडकर वय 60, वर्ष,याला सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
आरोपी विरूध्द भा द वी.कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मा.गडचिरोली नसल्याने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक स्वप्नील गोपाळे, नापोशि धनंजय चौधरी हे करीत आहेत.