विद्रोही कवी निलेश झाडे यांच्यावर कार्यवाही करण्याची भाजपाची मागणी ; भाजपा संविधान विरोधी; झाडे यांनी डागली तोफ

0
333

गोंडपिपरी: पत्रकार,इतिहास अभ्यासक तथा कवि निलेश झाडे यांच्या कार्यवाही करण्याची मागणी गोंडपिपरी भाजपाने केली आहे.झाडे यांच्या कवितेमुळे आम्हचा धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप भाजपाने केला आहे.यावर झाडे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले ” अभिव्यक्त स्वातंत्र्य मला सविधानाने बहाल केले आहे.त्या स्वातंत्र्याच्या वापर मी करीत आहे.भाजपाने दिलेल्या तक्रारीचा अर्थ ” भाजप अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरोधी ” असल्याचा अर्थ होतो.सविधानाने बहाल केलेले अधिकार भाजपाला मान्य नाही.गोंडपिपरी भाजप सविधान विरोधी आहे.” असा घणाघाती आरोप झाडे यांनी केला.गोळ्या झाडा अथवा अणुबाम टाका मी लिहीत लाहणार अशी प्रतिक्रिया झाडे यांनी दिली.झाडे यांनी पाठविलेला लेख ईथे दिला आहे…वाचा…!

भाजपा अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरोधी

*हमारे कैसे लहू,तुम्हारे कैसे दुध*
*तुम कैसे बांमन पांडे,हम कैसे सूद*

संत कबीर

मी ” साल्या हरामखोरांनो ” या शिर्षकाखाली कविता लिहीली.कवितेत फारच अश्लिल शब्दांचा वापर केला गेला,कवितेत श्री हनुमानांचा नावाचा वापर करण्यात आला.त्यामुळे आम्हचा भावना दुखावल्या,असा आरोप करीत गोंडपिपरी भाजपाने गोंडपिपरी पोलीस स्टेशनला तक्रार किवा निवेदन म्हणा दिले.

माझ्या मनात चाललेला कल्लोळ मि शब्दरूपांनी मांडला तर कुणाचा पोटात का दुखणे उठावे ? मला व्यक्त होण्याचा अधिकार सविधानाने दिला आहे.दाभोलकर,पानसारे,कलबुर्गी यांच्या सारखे माझी गोळ्या घालून हत्या करण्याचे तुम्हचे मनसूबे असले तरी चालेल.मी लिहीत राहणार.अवतीभवतीचे दुख मी मांडत राहणार.माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे.माणूसपणावर कुणी झडप घालण्याचा अघोरी प्रयत्न केला तर मी ताठ उभा राहील.माझ घर जाळा,मला उभ्याने जाळा..मी बोलणार..मी लिहीणार…! सविधानाने मला जे स्वातंत्र्य दिले आहे..त्या स्वातंत्र्याच्या मी पुरेपुर उपभोग घेणार.

*पाहण पुजे हरी मिले तो मै पुजू पहार*

एका लहानश्या दगडाला पुजल्याने देव मिळत असेल तर मी अख्या पहाड पुजील.तुम्हचा धमक्यांना मी घाबरणार नाही.
*पंडित मुल्ला जो लिख दिया*
*छाडि चाले हम कछु ना लिया*

ज्यानी लिहून ठेवले की हे पाप आहे,हे पुण्य आहे.त्यांचे मी ऐकणार नाही.माझी विवेकबुध्दी जे सांगेल ते मी मानेल.तुम्ही गप्प म्हटले की मी गप्प बसू,तुम्ही उठ म्हटले तर मी उठू.हे मला जमणार नाही.मी स्वतंत्र विचाराचा माणूस आहे.
*ब्रम्हा,विष्णू,महेसर कहीये,इन सिर लागी काई*
*इनही भरोसे मत कोई रहीयो,इनहु न मुक्ती पाई*

मुक्तीचा मार्ग मी माझ्या परीने निवेडेल.तुम्ही कोण जोर जबरदस्ती करणारे. माझ्या लेखणीला बेड्या घालू बघणारे तुम्ही कोण ? लोकशाही असलेल्या मी भारत देश्यात असतो.या देश्याचा सविधाने मला जे अधिकार दिले आहेत त्याचा वापर मी करणार.मग तुम्ही गोळ्या झाडा की माझ्या घरावर अणुबाँम टाका…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here