Homeगडचिरोली"खासदार सुप्रिया सुळे व संबंधित मंत्र्यावर देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा"...अन्यथा महाराष्ट्रात...

“खासदार सुप्रिया सुळे व संबंधित मंत्र्यावर देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा”…अन्यथा महाराष्ट्रात आंदोलन करणार…- दादासाहेब शेळके यांनी दिला इशारा….

Advertisements

चक्रधर मेश्राम. (सहसंपादक)

Advertisements

गडचिरोली :  दि. 14 /09/2021रोजी बारामती लोकसभा मतदारसंघातील भादलवाडी ता.ईंदापुर येथे महावितरण वीज कंपणीच्या उपकेंद्राच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमास खा.सुप्रिया सुळे व संबंधित राज्यमंत्री दत्तामामा भरणे व प्राजक्ता तनपुरे उपस्थित होते सदर कार्यक्रमास मान्यवर भाषण करत असताना त्यांच्या पायाजवळ भारतीय संविधान होते. त्यामुळे देशातील संबंध संविधानप्रेमी,देशप्रेमी,आंबेडकरप्रेमी यांच्या भावना दुखावल्या आहेत.मुळातच मंत्री होत असताना भारतीय संविधान भाग 6 “राज्य” मध्ये आर्टिकल 164 नुसार मंत्रीपदाची शपथ घेत असताना संविधान कायदा यांचे जतन संरक्षण करण्याची हमी मंत्री देत असतो.पण वरील कार्यक्रमात खा.सुळे संबंधित मंत्र्याने संविधान पायाजवळ ठेवून भारतीय संविधानाचा अवमान केलेला आहे.त्यामुळे मी सदरील घटनेचा भिम टायगर सेना या क्रांतिकारी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो.माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची जाहीर मागणी करतो.

भारतीय संविधानातील बेसिक स्ट्रक्चर मधील भाग 3 मधील fundamental right अर्थात मूलभूत हक्क मधील article 14 मध्ये कायद्यापुढे सर्व समान आहेत मग तो कितीही मोठा व्यक्ती असला तरी चालेल तसेच भारतीय संविधान भाग-4 A fundamental duties अर्थात मूलभूत कर्तव्य मध्ये आर्टिकल 51A नुसार भारतीय संविधानाचे पालन व आदर करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असते या ठिकाणी खासदार सुळे आणि संबंधित मंत्र्यानी संविधानाचे पालन व आदर न करता संविधानाचा अनादरच केलेला आहे. त्यामुळे मी भिम टायगर सेना प्रमुख या नात्याने खा.सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तामामा भरणे, प्राजक्ता तनपुरे व आयोजक यांच्यावर भा.दं.वि.124 अ नुसार देशद्रोहा चा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी व संबंधित मंत्र्यांचे राजीनामे तात्काळ घ्यावे.अशी मी जाहीर मागणी मा.मुख्यमंत्री व मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात येत आहे. जर वरील मागणी मंजूर नाही झाली तर भिम टायगर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल . असा इशारा देण्यात आला

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!