Home Breaking News ऑल इंडिया पँथर सेनेची जिल्हा संघठन बैठक संपन्न जिल्हा युवा अध्यक्ष...

ऑल इंडिया पँथर सेनेची जिल्हा संघठन बैठक संपन्न जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके तर जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर यांची नियुक्ती

दिपक साबने,जिवती

जिवती : संपूर्ण महाराष्ट्रात अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. येथील यंत्रणा वाढते अत्याचार रोखण्यास कुचकामी ठरत आहे. विकृत मानसीकतेच्या माध्यमातून बौद्ध, आदिवासी, बहुजनातील सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबून त्यांच्यावर हल्ले घडवून आणण्याचा कट येथील मनुवादी विचारांच्या लोकांकडून होत आहे. या विकृत मानसिकते विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक दिपकभाई केदार सातत्याने संघर्ष करीत आहेत.

संघर्षनायक दिपकभाई केदार यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे व सुरेश नारनवरे सह सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठा झंझावात सुरु झाला आहे. दिनांक १९.०९.२०२१ ला डिआरसी हेल्थ क्लब बुद्धविहार बंगाली कँप येथे नुकतीच जिल्हा संगठन बैठक पार पडली. या बैठकीत ऑल इंडिया पँथर सेना संगठन वाढविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात युवकांची मोठी फळी निर्माण करण्याकरिता पँथर चे युवा जिल्हाध्यक्ष म्हणून अजय झलके यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यागीभाई उर्फ प्रविण देठेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

ऑल इंडिया पँथर सेना संगठन बैठकीचे अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संतोष डांगे, सुरेश नारनवरे, भैय्याजी मानकर, मिलिंद दुधे, वनकर साहेब, निशाल मेश्राम, पपीता जुनघरे, सारिका उराडे, रेखा गेडाम, आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना पँथर चे जिल्हा मार्गदर्शक म्हणून सुरेश नारनवरे यांनी आपल्या मार्गदर्शनात या जिल्ह्यात युवकांनी मोठ्या प्रमाणावर पँथर मध्ये सामिल व्हावे व अन्याय, अत्याचारा विरोधात जशास तसे बंड करावे असे आवाहन केले. तर सल्लागार म्हणून संतोष डांगे यांनी या कुचकामी व्यवस्थेविरुद्ध आता पेटून उठण्याची वेळ आली आहे. असे म्हणत या महाराष्ट्रातील विकृत व्यवस्थेविरोधात तोफ डागली.

पँथर चे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना या जिल्हात जिथे जिथे अन्याय अत्याचार घडणार तिथे तिथे पँथर चा आवाज बुलंद होईल.या जिल्ह्यातील सर्व तालुक्यात संघटन उभं करण्यास त्या तालुक्यात बैठकीचे आयोजन केले जात आहे.

पँथर चा नारा घराघरातून मि पँथर बोलतोय आवाज बुलंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युवकांची फळी निर्माण केली जात आहे. भविष्यात अन्याय, अत्याचार विरोधात पँथर बुलंद आवाज करणार अशा विविध विषयांवर कणखर मत मांडले.
नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बैठकीला मोठ्या संख्येने महिलांची व युवकांची आणि नागरिकांची उपस्थिती होती.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितले.

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये...

सांगली हादरल! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, विष घेत आयुष्य संपवलं

सांगली – म्हैसाळकारांचा सोमवारचा दिवस उजाडला तोच एका हादरवणाऱ्या बातमीनं.. गावात परिचित असलेल्या दोन भावांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती काही क्षणांत गावातल्या घराघरात...

मोठी बातमी: जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना कॅन्सरचे निदान.. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु

चक्रधर मेश्राम पुणे: जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना ब्लड कँसरचे निदान झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमटे यांना दुर्मिळ अशा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जन्मताच आईचे मातृत्व हरवलेल्या आदेशचे स्वतःची सायकल असण्याचे स्वप्न कर्मयोगीने केले पूर्ण…

नागपूर: १० दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेला जवळपास ७ वाजले होते,अचानक एक कॉल आला. तो कॉल होता बिबी (सावळी ) त. हिंगणा जि. नागपूर या गावातील...

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना स्पष्टच सांगितले.

राज्यात शिवसेनेचे मातब्बर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये...

जागतिक योगादिनी मास्टर कुंदन पेंदोर सन्मानित

-सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिंपरी:- मागील तीन वर्षापासून तालुक्यातील विविध शाळेवर जाऊन निशुल्क योगा व कराटेचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षणाचे धडे देणारे कराटे प्रशिक्षक...

ग्रामस्थांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करा- शिवानी वडेट्टीवार

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विकासात्मक दूरदृष्टी कोनातून मोठ्या...

Recent Comments

Don`t copy text!