Homeचंद्रपूरब्रम्हपुरीअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा…

ब्रम्हपुरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस ३० ऑगस्ट २०२१ रोजी मा. श्री. दिक्षीत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी व तिची मैत्रीन हया अंगणवाडीला सुट्टी झाल्यानंतर जवळील मंदीरा समोर खेळत असताना आरोपी नामे राधेशाम हरीजी गुरुनुले वय ३६ वर्ष रा. सायगाव याने दोघी मुलीना टिव्हीवर मोटु पतलु कार्टून पाहायला चला असे म्हणुन दोघीचा हात धरुन आपले घरी घेवुन गेला व दार बंद करुन अल्पवयाचा फायदा घेवुन त्यांचेवर लैगींक अत्याचार केला. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अप.क. ७६३ / २०१८ कलम ३७६ (एबी) भादंवि सहकलम ४, ५ एम ६, १० बा. लै. अ. संरक्षण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा तपासात घेतल्यानंतर तत्कालीन पोउपनि अश्विनकुमार खेडीकर, व पोउपनि चंद्रकला मेसरे यांनी आरोपीस निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक ३०/०८/२०२० रोजी आरोपी नामे राधेशाम हरीजी गुरुनुले वय ३६ वर्ष रा. सायगाव यास कलम ६ बा. लै. अ. संरक्षण कायदा मध्ये १० वर्ष शिक्षा व ३००० रू दंड, कलम १० बा. लै. अ. संरक्षण कायदा मध्ये ५ वर्ष शिक्षा व २,०००/- रू दंड न भरल्यास ०४ महिने शिक्षा मा. श्री. दिक्षीत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. देवेंद्र महाजन, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा. रामदास कोरे, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांनी काम पाहिले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!