बोरगाव येथील महिलेवर प्राणघातक हल्ला; आरोपीला गोंडपिपरी पोलिसांनी केली अटक

0
1435

शरद कुकूडकार प्रतिनिधी

गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव गावातील 55 वर्षीय दर्शना झाडें नामक महिलेवर गावातील चं संघमित्र फुलझेले वय 36 वर्ष यांनी धारदार शास्त्राने वार करून गंभीर झखमी केले आहे. पीडित महिलेची शोटीशी पान टपरी असून आरोपी आणि पीडित महिला हे एकमेकांना शेजारी होते आणि त्यांच्यात काहीतरी जुने वैमनश होते असे गावकार्यांकडून कळले.आज गुरुवार ला खर्रा घेण्यासाठी गेलेले आरोपी आणि पीडित महिला यांच्यामध्ये खऱ्यावरून क्षुलक वाद झाले. आणि त्या क्षुल्लक वादावरूनच आरोपीने महिलेला धारदार शास्त्राने वार करून गंभीर झखमी केले ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि गावात एकच हाहाकार माजला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील काही सुज्ञ नागरिकांनी गोंडपिपरी चे ठाणेदार मा. जीवन राजगुरू यांना फोनद्वारे माहिती दिली माहिती मिळताच ठाणेदारांनी आपल्या फोजफाट्यासह घटनास्तळ गाठून आरोपीला अटक केली पुढील तपास चालू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here