HomeBreaking Newsचक्कर येवून पडल्याने वेगवेगळया भागात राहणा-या दोघांचा मृत्यु

चक्कर येवून पडल्याने वेगवेगळया भागात राहणा-या दोघांचा मृत्यु

दीपाली गायकवाड प्रतिनिधी
नाशिक : शहरात चक्कर येवून पडल्याने मृत्युचे प्रमाण वाढले असून, वेगवेगळया भागात राहणा-या दोघांचा मंगळवारी (दि.३१) मृत्यु झाला. त्यात ४७ वर्षीय व्यक्तीसह एका ८० वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शाम शर्मा (८० रा.मोंढे मळा,पाथर्डी फाटा) हे वृध्द मंगळवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून जमिननीवर कोसळले होते. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत. दुसरी घटना जयभवानीरोड भागात घडली. लक्ष्मण ढारकरगे (४७ रा.साई कॉलनी,जगतापमळा) हे दुपारच्या सुमारास आपल्या घरातील बाथरूममध्ये अचानक चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कुटूंबियांनी त्यांना बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार परदेशी करीत

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!