शहरातील NHAI रस्त्यांचे कामे पूर्ण होत नसल्याने नागरिकांना करावा लागतो समस्यांचा सामना…#रस्ता खोदकामामुळे नळ पाईपलाईन फुटत असल्याने पिण्याच्या पाण्याची होते टंचाई

0
190

नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली:- गडचिरोली शहरात दोन वर्षापासून गटरलाईन चे काम तसेच राष्ट्रीय माहामार्ग चे काम सुरू आहे. शहरातील सर्व चांगले रस्ते फोडून गटरलाईन टाकले परंतु रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे वाहन काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.

सध्या पावसाळा सुरू झालेला आहे तरीही सर्व रस्त्यावर मोठे खड्डे पडून पाणी साचलेले आहे, रस्ते चिखलाने माखलेले आहेत पायदळ रस्त्याने जाणयेने करूच शकत नाही, दुचाकी खूप संभाडून चालवावी लागते त्या मध्ये घसरुन पडण्याची दाट शक्यता आहे, आणि त्यामुळे अनेकदा नागरिक जखमी झालेले दिसतात. 

वर्षभरापासुन राष्ट्रीय महामार्ग चे काम इंदिरा गांधी चौक पासून तर शासकीय महाविद्यालय चामोर्शी रोड पर्यंत मार्ग खोदून ठेवल्या मुळे सर्वच वाहनांचा प्रवास एकाच साईड ने होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत आणि खोदलेल्या साईड ने पाण्याचे डबके तयार झालेले असल्याने त्यात पडुन लहान मुले तसेच नागरिकांना आपले प्राण गमवायचे फार मोठा धोका निर्माण झालेला आहे.

ऐन पावसात मध्ये कत्राटदाराने काम चालू केले आणि त्यामुळे कामाच्या माशीनेरिस रस्त्यावर उभ्या असल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्या करीत त्रास सहन करावे लागत आहे याकडे स्थानिक प्रशासन आणि शासनाच पूर्णपणे दुर्लक्ष दिसत आहे.

चामोर्शी रोड वर रस्त्याच्या बाजूला नाली च्या खोदकामामुळे नळाची पाईपलाईन तोडलेली असल्याने नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. तरीही संबंधित कंत्राटदारावर मा.जिल्हाअधिकारी साहेबानी कार्यवाही करून लवकरात लवकर काम पूर्ण झाले पाहिजे असे निर्देश दयावे हि विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here