HomeBreaking Newsशब्दांकुर साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य लेखन...

शब्दांकुर साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूरच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर… सर्वोत्कृष्ठ रचना परमानंद जेंगठे तर उत्कृष्ठ रचना कवयित्री राधा गर्दे

शब्दांकुर साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा चंद्रपूरच्या वतीने दिनांक ११ जुलै २०२१ रोजी राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली होती. सध्या सर्वदूर पावसाचेच साम्राज्य दिसून येत आहे आणि वातावरणातही एक आल्हाददायक गारवा आलेला आहे. याच सध्यास्थितीचे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष कवी सुशांत मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व इतरांच्या सहकार्यातून आणि ज्येष्ठ साहित्यिक पुढील तपासकार विजय वाटेकर व झिबलीकार गणेश कुंभारे यांच्या मार्गदर्शनात “पाऊस ” या विषयावरच मुक्त काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेमध्ये गडचिरोली ते मुंबई तसेच अमरावती ते सिंधुदुर्ग पर्यंतच्या अनेक मान्यवर कवी/ कवयित्रींनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला होता. इतकेच नाही तर या स्पर्धेमध्ये बंगलोर येथील परवीन कौसर या कवयित्रींनी आणि आपल्या मातृभूमीची नाळ जोडून असलेल्या कवयित्री तनुजा प्रधान यांनी अमेरिकेमधून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. स्पर्धेच्या सुरुवातीला ५० ते ६० स्पर्धक अपेक्षित असलेली संख्या नव्वदच्या वर कधी पोहोचली हे कळलेच नाही असे मत शब्दांकुर फाऊंडेशनचे अध्यक्ष दुशांत निमकर यांनी व्यक्त केले.
सदर स्पर्धेचे संकलन जिल्हा उपाध्यक्ष संभाशिव गावंडे व अतुल येरगुडे यांनी केले आहे तर परीक्षक म्हणून श्रीमती वैशाली भामरे मॅडम सहसंपादक,जीवन गौरव मासिक, नाशिक यांनी उत्तम प्रकारे परीक्षकाची जबाबदारी सांभाळलेली आहे. आलेल्या ९३ कवितांमधून सर्वोत्कृष्ट कविता म्हणून कवी परमानंद जेंगठे, मुल यांची कविता तर उत्कृष्ट कविता म्हणून कवयित्री राधा गर्दे ,कोल्हापूर यांची कविता निवडल्या गेली. प्रथम क्रमांक कवी रत्नाकर सुखदेवे व कवयित्री पोर्णिमा विश्वास , द्वितीय क्रमांक कवयित्री मेघा भांडारकर व कवी शुभम मोहुर्ले,तृतीय क्रमांक कवयित्री पूनम डहाके व कवयित्री अर्चना गरुड यांच्या कवितांना देण्यात आला. उत्तेजनार्थ मध्ये कवयित्री सुनिता कपाळे ,कवी मदन मते ,कवयित्री आशा फुलके, कवी अनिल आंबटकर ,कवी खेमदेव कन्नमवार यांच्या कवितांचा तर लक्षवेधी कवितांमध्ये कवी भास्कर मंगर , कवी अमरेंद्र कोंडावार, कवी सचिन मुळे यांच्या कवितांचा क्रमांक लागला. तसेच भावस्पर्शी कवितांमध्ये कवयित्री अनिता गायकवाड ,कवी राजेंद्र उदारे यांच्या कवितांचा क्रमांक आलेला आहे .
सर्व विजेत्या स्पर्धकांचे शब्दांकुर साहित्य व सांस्कृतिक मंच च्या कार्यकारणीच्या वतीने अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांना संस्थेच्या वतीने संस्थेचे ग्राफिक्स कार व तंत्रनिर्देशक श्री. विघ्नेश्वर देशमुख यांनी स्वकल्पनेतून तयार केलेले अतिशय आकर्षक असे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आले. ज्याचे सर्वच स्पर्धकांनी अतिशय मनापासून कौतुक केलेले आहे.
स्पर्धेच्या नियोजन व यशासाठी शब्दांकुर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. दुशांत निमकर सर,शब्दांकुर साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष श्री. सुशांत मुनगंटीवार ,सचिव श्री. अतुल येरगुडे , संभाशिव गावंडे, नेतराम इंगळकर, विघ्नेश्वर देशमुख ,ऋषिकेश तांडेकर,राजेश्वर अम्मावार,किशोर चलाख,राकेश शेंडे,सुरज दहागावकर,आशिष ढवस,प्रशांत खुसपुरे, तानाजी अल्लीवार,राहुल पिंपळशेंडे, गणेश पिंपळशेंडे,महिला आघाडीप्रमुख शितल कर्णेवार,अर्चना यदनूरवार यांनी परिश्रम घेतले. 🙏

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!