बल्लारपूर टोल नाका परिसरात दारू पिऊन वाहन चालविताना दुसऱ्या वाहनाला धडक…

0
494

बल्लारपूर -: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी वरून दारूमुक्ती कडे प्रवास सुरु असतांना त्याचे परिणाम आता दिसू लागले आहे विश्वसनीय सूत्राच्या माहिती नुसार चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेल्या टोल नाका परिसरात एका चार चाकी वाहन ज्यात 4 व्यक्ती बसले असतांना या वाहनाने दुसऱ्या चारचाकी वाहनाला मागून धडक दिल्याचे वृत्त आहे या अपघातात दुसऱ्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे विशेष बाब म्हणजे ज्या वाहनाने दुसऱ्या वाहनाला धडक दिली त्या गाडीचा वाहनचालक अति मद्य प्राशन करून वाहन चालवीत असल्याचे निदर्शनास आले यावेळी अनेक नागरिकांनी व्हिडीओ काढल्याचे वृत्त आहे सर्वसामान्य नागरिकांनी मद्य प्राशन करून वाहन चालविले असता त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जाते मात्र एखाद्या अधिकाऱ्याने सदर कृत्य केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here