शेतात विद्युत तारेचा स्पर्श लागल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू…

578

ब्रम्हपुरी: तालुक्यातील एकरा येथील शेतकरी हरी मूरखे नेहमी प्रमाणे सकाळी शेतीकामासाठी शेतात गेले असता विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा शेतातच मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी 6-30 ते 7 च्या दरम्यान घडली आहे. हरि मूरखे नेहमीप्रमाणे शेतात पिक पाहणी व शेतकाम करण्याकरिता गेले असता त्यांच्या शेताजवळील खांब वाकला असल्याने त्याची विद्युत तार खाली पडली होती ती हरि मूरखे यांना दिसली नाही व त्याला स्पर्श झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. काही वेळानंतर गावकर्यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी लगेच पोलीस विभागाला तसेच महावितरण विभागाला माहिती दिलेली आहे. एक चांगला होतकरू शेतकरी च्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.