मोठी बातमी: दहावीचा निकाल उद्या लागणार..असा तपासा तुमचा निकाल

0
3359

मुंबई : कोरोनामुळे आतापर्यत दहावीचा निकाल रखडला होता. हा निकाल कधी आणि कसा लागणार याकडेच सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागूण राहीले होते. परंतु अखेर आता ही प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै,२०२१ रोजी दुपारी १:००वा. जाहीर होईल. अशी सुचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे

हा निकाल कसा लावण्यात येईल आणि मुल्यमापनासाठी कोणता फॉर्म्यूला वापरला जाईल याबद्दल लोकांच्या मनात संभ्राम आहे.

तर या निकालात 50 गुण नववीच्या परीक्षेच्या आधारावर, तर 30 गुण सराव परीक्षा आणि 20 गुण अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत आहे आणि या सगळ्यावर आधारीत हा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.

असा तपासा तुमचा निकाल

अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. maharashtraeducation.com

मुख्यपृष्ठावरील महाराष्ट्र इयत्ता 10 च्या निकालाच्या 2021 च्या लिंकवर क्लिक करा.

आपणास एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.

आपली क्रेडेन्शियल्स टाइप करा आणि लॉग इन करा.

आपला एसएससी निकाल आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

संदर्भासाठी निकालाचे प्रिंटआउट डाउनलोड करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here