विद्युत विभागाच्या कार्यालयाजवळील जंगलात वृद्ध इसमाची गळफास घेऊन आत्महत्या…

0
203

धानोरा :-झाडाला गळफास घेऊन 15 जुलै सकाळी नऊ वाजताच्या सुमारास विद्युत विभागाच्या कार्यालयाजवळील जंगलात वृद्ध इसमाची गळफास घेऊन आत्महत्या उघडकीस आली. रामभाऊ नीकोटे वय 60 वर्ष रहाणार नवापलाट असे धानोरा मृत्यूचे नाव आहे. मृत्यूकास दारूचे व्यसन होते.मागील काही दिवसापासून त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्यामुळे त्याला शनिवारपासून ग्रामीण रुग्णालयात धानोरा येथे भरती करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयात असतानी तो 14 जुलै दुपारी एक वाजता बाहेर गेला होता. परंतु त्याच दिवशी तो परत आला नाही. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी विद्युत विभागाच्या कार्यालयाच्या जवळील जंगलात गळफास लावलेल्या अवस्थेत बकऱ्या चारनाऱ्या मुलांना आढळून आला. बकऱ्या चारणाऱ्या मुलांनी या घटनेची माहिती धानोरा पोलिस स्टेशनला दिली असून पुढील तपास सुरू आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here