गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 24 दरवाजे उघडले…

351

गडचिरोली जिल्ह्यात मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 24 दरवाजे सोडण्यात आले. या 24 दरवाजातून 43680 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. या धरणात एकूण 83 गेट असून त्यातून फक्त 24 गेट सोडण्यात आलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे धरणात पाण्यात वाढ झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेले वैनगंगा नदी वर्धा नदी प्रणहिता नदी इंद्रावती नदी पारलाकोटा नदी सामान्य आहे. हे सर्व नद्या केंद्रातील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे. चिचोडा बॅरेजचे 38 गेट उघडण्यात आले असून त्यातून तेराशे 24 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.