Homeराजकीयराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर...

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

चंद्रपूर दि. 14 जुलै : राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि.15 जुलै 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता हिराई विश्रामगृह ऊर्जानगर येथून कोरपनाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कोरपना येथे आगमन व राखीव. दुपारी 12:30 कोरपना येथून जिवतीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता, विदर्भ महाविद्यालय जिवती येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता जिवती येथून पाटणकडे प्रयाण. दुपारी 2:30 वाजता पाटण येथे आगमन व खावटी योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना किट वाटप व आदिवासी आश्रम शाळेसाठी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन. दुपारी 4 वाजता पाटण येथून कोसंबीकडे प्रयाण, सायंकाळी 4:30 वाजता कोसंबी येथे आगमन व आदिवासी पाड्यास भेट. सायंकाळी 5 वाजता, कोसंबी येथून चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता पंचवटी लॉन, तुकूम येथे आगमन व राखीव. सोयीनुसार हिराई विश्रामगृह ऊर्जानगर, चंद्रपूर येथे आगमन व राखीव.

शुक्रवार दिनांक 16 जुलै 2021 रोजी सकाळी 7:30 वाजता हिराई विश्रामगृह ऊर्जानगर, चंद्रपूर येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!