ग्रामसभा स्वायत्त परिषद व आदिवासी गोंडवाना गोटूल समितीच्या वतीने उपोषण…

0
85

प्रितम गग्गुरी प्रतिनिधी

Advertisements

सिरोंचा :- सिरोंचा शहराला लागून असलेल्या वन विभागाच्या १ हेक्टर जागेवर २००१ पासून आदिवासींचे अतिक्रमण आहे. सदर जागेवर सामाजिक केंद्राचे बांधकाम केले जाणार आहे. ह्या जागेवर वन विभागाने वृक्षारोपण न करता ती जागा आदिवासींसाठी सोडावी, या मागणीसाठी तालुका ग्रामसभा स्वायत्त परिषद व आदिवासी गोंडवाना गोटूल समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ५ जुलैपासून उपोषण सुरू करण्यात आले.गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहूल आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील शहीद वीर बाबुराव शेडमाके, भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व सांस्कृतिक, क्रीडा व धार्मिक कार्यासाठी सिरोंचा येथे आदिवासी गोंडवाना गोटूल समितीची स्थापना केलेली आहे. सदर कार्य पार पाडण्यासाठी सामाजिक केंद्र (गोटूल) बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. तालुक्याच्या भागातील आदिवासी गावे ही १०० टक्के आदिवासी आहेत. तालुका मुख्यालयापासून ८० ते ९० किलोमीटर अंतरावर आहेत. प्रत्येक गावात जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नाहीत. आदिवासी संस्कृतीनुसार प्रत्येक गावात गोटूल आहे. गोटूलमध्ये एकत्र येऊन आदिवासी समाजिक कार्य पार पडतात. सिरोंचा येथे 2001 पासून सर्व्हे क्र. ७१/१ मधील १ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण करून गोटूल भूमी साठी ती जागा ताब्यात घेतली होती. सदर जागेचा उपयोग आदिवासी बांधव करीत आहेत. परंतु सदर जागेवर उपवनसंरक्षकांच्या आदेशानुसार वृक्षारोपणासाठी खड्यांचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या सामाजिक कार्यासाठी निश्चित केलेली जागा हिरावली जाणार आहे. निश्चित केलेल्या जागेवर आदिवासी समाजासाठी गोटूल बांधकाम अत्यावश्यक आहे. त्यामुळे वृक्षारोपण थांबवावे व आदिवासी समाजाच्या ताब्यात असलेली 1हेक्टर जमिन समाजासाठी सोडावे. तसेच वन जमिनी चा सामुहिक वनहक्क द्यावा. मजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी तालुका ग्राम सभा स्वायत्त परिषद व आदिवासी गोंडवाना गोटुल समिती च्या वतीने करण्यात आली.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here