चंद्रपूर जिल्हातील दारू बंदी उठविल्याचा निर्णयाविरोधात महाविकास आघाडी सरकारचा निषेध म्हणून मुंबईतील आझाद मैदानावर व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने धरणे आणि निदर्शन आंदोलन केलंय. महाराष्ट्रातील जवळपास 100 संस्थांनी एकत्र येत या मंचाच्या नेतृत्वात आपला विरोध दर्शवत या दारुबंदी हटवण्याच्या निर्णयाचा निषेध केलाय. याबाबत या व्यसनमुक्त महाराष्ट्र मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील यांनी या धरणे आंदोलनाची भूमिका स्पष्ट केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशीही मागणी त्यांनी केली
Home Breaking News चंद्रपुरातील दारूबंदी उठविल्याच्या विरोधात आझाद मैदानावर धरणे आंदोलन…१०० संघटनांनी दिला पाठिंबा…