रेगडी येथे पोलीस दलातर्फे पार पडला भव्य कृषी मेळावा..

370

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
गडचिरोली:
मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल सर, मा.अप्पर पोलीस अधीक्षक कलवानिया सर व शेख सर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली उपविभाग ढोले सर व प्रणिल गिल्डा सर यांचे मार्गदर्शनाखाली दि. 06/07/2021 रोजी पोलिस मदत केंद्र रेगडी येथे भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मा. नगराळे साहेब कृषी अधिकारी पंचायत समिती गडचिरोली, मा.मोरकुटे साहेब कृषी विस्तार अधिकारी,वनपरिक्षेत्र अधिकारी गुड्डाम साहेब,पशु वैद्यकीय अधिकारी सागर डुकरे साहेब चामोर्शी,तलाठी रेगडी साईनाथ कुळयेटी,ग्रामसेवक प्रकाश सलामे साहेब,आरोग्य केंद्र रेगडी चे श्री डॉ.मेश्राम साहेब,भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरेशजी शाहा,समाज सेवक प्रशांतजी शाहा,पंचक्रोशीतील तलाठी,सरपंच,ग्रामसेवक, रोजगार सेवक,कृषी सेवक,कृषी मित्र व सुमारे 100-150 शेतकरी बांधव यांचा उपस्थितीत मेळावाचे कार्यक्रम पार पडले असून,सदर कार्यक्रमांमध्ये कृषी व आरोग्य संबंधीत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच विविध शासकीय योजना संबंधी माहिती देण्यात आली.त्याचा सर्व उपस्थितांनी लाभ घेतला.तसेच 25 बॅग युरिया खत,10बॅग धानाचे बियाणे,45 पॅकेट वाल शेंगा बियाणे,25 पॅकेट तूर बियाणे,05 पॅकेट पत्ता कोबी बियाणे व 45 नग रेनकोट चे शेतकरी बांधवाना प्रमुख अतिथीच्या हस्ते वाटप करण्यात आले या वेळेस सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.सदरच्या कार्यक्रसाठी रेगडी गावातील प्रतिष्टीत नागरिकांनी मदत केली तसेच पोस्टातील psi शिंब्रे साहेब, psi मगरे साहेब,srpf ग्रुप चे pi शिंदे साहेब, psi साळवे व सर्व अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले.