Advertisements
Home गडचिरोली पोलीस मदत केंद्र रेगडी येथे 'पोलीस दादालोरा खिडकी' या कार्यक्रमाचे उद्घाटन..

पोलीस मदत केंद्र रेगडी येथे ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या कार्यक्रमाचे उद्घाटन..

ब्युरोचिफ प्रशांत शाहा

Advertisements

गडचिरोली: गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस दादालोरा खिडकी व जॉब कार्ड कॅम्पचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी  पंचायत समिती चामोर्षी,कृषी विभाग चामोर्षि यांचेशी समन्वय साधून पोलीस मदत केंद्र रेगडी हद्दीतील 37 शेतकऱ्यांना धान्य बियाणेचे पिशवी 50 टक्के अनुदानावर पोलीस विभागाचे वतीने वितरण करण्यात आले. तसेच 34 लोकांचे जॉब कार्ड व 96 लोकांचे आयुष्यमान भारत कार्ड, तयार करून वाटप करण्यात आले व 387 नवीन कार्ड तयार करण्यात आले.

यावेळी जी. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक पेन व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आले तसेच  बिरसा मुंडा शासकीय प्रोत्साहन योजना राबवित पो. म.के. रेगडी हद्दीतील सरपंच, रोजगार सेवक, समाज सेवक यांना पो. म.के. रेगडी तर्फे बक्षीस देण्यात आले.यावेळी सदर कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधीकारी प्रणिल गिल्डा ,चामोर्शी चे पोलीस निरीक्षक विपिन शेवाळे साहेब ,घोट पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप रोंडे साहेब,भाजपा बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष  सुरेश शाहा,रेगड़ी प्राथमीक आरोग्य केंद्राचे डॉ.राजेंद्र शेंडे साहेब,ग्रामसेवक प्रकाश सलामे,तलाठी साईनाथ कुळेयेटी,पत्रकार प्रशांत शाहा,सरपंचा कु.मोहिता लेकामी,उपसरपंच श्री प्रवीण मोहूर्ले, सदस्य प्रवीण पोटावी,अश्विनी नेवारे व गरंजी, वेंगणुर,रेगडी येथील गावकरी उपस्थित होते.या वेळी कार्यक्रमाचे संचालन पो.अ. संभाजी सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पो. उपनिरीक्षक नंदकुमार शिम्ब्रे साहेब यांनी केले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू.. नागरिक संतप्त महामार्गावरील ७-१० ट्रक पेटवले

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी) गडचिरोली: आलापल्ली ते आष्टी ३५३ सी या राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिलेचा जागीच मृत्यू झाला...

गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचा आत्मसपर्पण,माओवाद्यांना मोठा धक्का

गडचिरोली :- विलय दिवसाच्या दिनी माओवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.दोन जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या दोन्ही माओवाद्यांवर एकत्रितपणे सहा लाखांचे बक्षीस होते. अनिल...

रेगडी-घोट मार्गावर दुचाकीचा अपघात… वनरक्षकसह एक इसम गंभीर जखमी

ब्युरोचिफ प्रशांत शाहा चामोर्शी: तालुक्यातील रेगडी ते घोट मार्गावर आज सकाळी सुमारे 10 वाजता दोन दुचाकीचा समोर समोर जब्बर धडक बसली. या धडकेत बोलेपल्ली येथील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सिंधी येथे लंम्पी रोगांवर लसीकरण…

राकेश कडुकर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी) राजुरा: तालुक्यातील सिंधी येथे बुधवार दिनांक २८/०९/२०२२ला लंम्पी रोगाला पळवण्यासाठी उपसरपंच रामभाऊ ढुमणे आणि पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ जल्लेवार साहेब...

ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुरात चार मजली इमारत कोसळली…तीन महिला मलब्यात दबल्याची माहिती..

चंद्रपुर :- शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील पाटील यांची चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 महिला मलब्यात दबल्याची माहिती...

आ. वडेट्टीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार…शहर काँग्रेस सावलीचा उपक्रम

सावली: गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष निष्ठा जोपासत तन-मन - धनाने काम करणाऱ्या एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते,...

कोट्यावधींच्या विकास कामातून ब्रह्मपुरी तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात…#माजी मंत्री आ. वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांचे फलित….#रस्ते ,सांडपाणी नाल्या, शुद्ध पेयजल योजना कामांचे भूमिपूजन व लोकार्पण…

ब्रम्हपुरी: तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार हे नेहमीच आपल्या मतदारसंघातील गावखेड्यात दौरा करत असतात. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!