Advertisements
बीड : बीडच्या वडवणी जवळील बीड परळी महामार्गावरिल नेहरकर हॉटेल जवळ आज पहाटे भीषण अपघात झाला आहे यात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यूव झाला आहे . कामानिमित्त बाहेरगावी जात असलेल्या ग्रामसेवकच्या कारचा व ट्रॅव्हल्सचा सामोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा चुराडा झाला आहे.
Advertisements
दरम्यान देवडी येथील ग्रामसेवक राजेंद्र मुंडे हे बीड येथे स्विफ्ट गाडी (एम एच ०२ सिपी ५२२६) कामानिमित्त पहाटे निघाले होते. याच दरम्यान पुण्यावरून परळीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची (एम एच २९ व्ही ७२२७) समोरासमोर धडक झाली. या अपघातात राजेंद्र मुंडे यांचा जागीच मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वडवणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा चुराडा झाला आहे.
Advertisements
Advertisements