Homeगडचिरोलीविद्यापीठ स्तरीय ऑनलाईन नाट्य कला कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम संपन्न...

विद्यापीठ स्तरीय ऑनलाईन नाट्य कला कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम संपन्न…

Advertisements

गौरव लुटे ( प्रतिनिधी )

Advertisements

गडचिरोली- विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा वाव मिळावा, नाट्य क्षेत्राबद्धल ओढ निर्माण व्हावी,कलेचे अनन्ययसाधारण महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य मार्गदर्शन मिळावे व चांगले उत्कृष्ट कलाकार घडावे या अनुषंगाने चरित्र कलादर्पण चिमूर जि. चंद्रपूर आणि संजीवनी फाऊंडेशन गडचिरोली द्वारा आयोजित विद्यापीठ स्तरीय ऑनलाईन नाट्य कला कार्यशाळेचे आयोजन ४ जून ते ७ जून २०२१ पर्यंत करण्यात आले होते.
कार्यक्रमाला उद्धाटनीय मान्यवर म्हणुन मा. प्रा. डॉ.नरेंद्र आरेकर प्राध्यापक. गोविंदराव मुनघाटे महा.कुरखेडा मा. प्रा.डाॅ. प्रिया गेडाम मा. संचालक.विद्यार्थी विकास विभाग , गो.वि.गडचिरोली ज्ञानेश्वर वसंतराव सानप चेअरमॅन संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाची ४ ते ७ जून २०२१ दरम्यान रूपरेषा व सत्र , याप्रमाणे ४ जून पहिले सत्र ११. ते दुपारी २. वा. मा.प्रा.जयश्री कापसे गावंडे , विषय – चला मैत्री करु नाटकरी ,चला सांगड घालू कलेची . दुसरे सत्र ( दु.२ ते सां.४ वा.) मा.श्री. अनिल केंगार , विषय – भारुड सादरीकरण व त्या विषयीची माहिती दि.५ जून पहिले सत्र ( स.११ ते ०१ वा. ) मा.प्रा. शिवपाईक योगेश चिकटर
विषय – महाराष्ट्रातील लोक कलांची माहिती व सादरीकरण ) दुसरे सत्र ( दु. २ ते ४ वा. ) मा.श्री. रावबा गजमल, विषय – विद्यार्थ्यांची आवड व नाट्यकलेसाठीचा प्रवास. दि. ६ जून पहिले सत्र ( स. ११ ते दु.०१ वा. ) मा. श्री. स्वामीराज भोसे , विषय – चला जोडू पथनाट्याशी नाते, चला जाणून घेऊ तंत्रज्ञ सारे
दुसरे सत्र – ( दु. ०२ ते ०४ वा. ) मा. श्री.अस्लम शेख , विषय – नाट्य लेखन व संवाद लेखनाचे कौशल्य व तंत्र . दि. ७ जून पहिले सत्र ( स.१० ते दु. १.३० वा. ) मा. श्री. प्रदीप सलगलकर , विषय – अभिनय कसा करावा व अभिनयासाठी लागणारे तंत्र . दुसरे सत्र ( दु. ०२ ते सांय. ०४ वाट. ) समारोप. अश्याप्रकारे नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित केले होते.
या कार्यक्रमाला तज्ञ्यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना खूप भावले व विविधरंगी कलेविषयीचे पैलू उलगडून दाखवले.
आज दि. ०८ जून २०२१ ला ११ वा.कार्यक्रमाचे समारोपीय कार्यक्रम पार पडले.
गोंडवाना विद्यापीठात आपल्या विद्यार्थ्यांना लवकरचं कलेचे नवे दालन खुले होईल.अशी ग्वाही गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव मा.डाॅ. चिताडे सरांनी दिली. समारोपीय कार्यक्रम संजीवनी फाऊंडेशन‌चे सचिव गोरक्ष चांगदेव भवर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलसचिव मा.डाॅ. अनिल चिताडे, मा.प्रा.डाॅ.श्याम खंडारे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मा.प्रा.डाॅ. विजय सोमंकुवर संचालक, क्रिडा विभाग सरदार पटेल‌ महाविद्यालय चंद्रपूर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका ठाकरे,प्रास्ताविक सुरज चौधरी यांनी केले, कार्यशाळेत एकुण विद्यापीठातील ४० विद्यार्थ्यांनी सहभाग‌ घेतला होता. कार्यशाळेचे समारोपीय आभार प्रदर्शन सचिन भरडे यांनी केले.
या महत्त्वाकांक्षी कार्यशाळेचे आयोजन, आयोजक – सचिन भरडे संस्थापक / प्रमुख चरित्र कलादर्पण, चिमूर. सुरज चौधरी जिल्हाध्यक्ष, संजीवनी फाऊंडेशन गडचिरोली.कु. रागीणी स्वामी सहप्रमुख चरित्र कलादर्पण, चिमूर मा. श्री. राजेश हजारे विस्तार समिती अध्यक्ष संजीवनी फाऊंडेशन म.हा.यांनी केले.

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!