HomeBreaking Newsसॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग , 15 महिलासह 2 पुरूष कर्मचारी मृत्युमुखी...

सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग , 15 महिलासह 2 पुरूष कर्मचारी मृत्युमुखी…

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
मुळशी पुणे: पुण्याच्या पिरंगुट MIDC परीसरात एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीतील आज संध्याकाळी 5 वाजेदरम्यान भीषण आग लागली. यावेळी कारखान्यात अनेक जण अडकले होते. यापैकी आत्तापर्यंत 15 महिला कर्मचारी आणि 2 पुरुष कर्मचारी मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे.
अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत 37 मजूर अडकून पडले होते. काहींनी कसाबसा आपला जीव वाचवला. परंतु 17 जण कंपनीतच अडकून पडल्याची प्राथमिक मिळाली होती. त्यापैकी सर्व 17 जणांचे मृतदेह सापडले आहेत. भीषण आगीत होरपळून मृत्यू झाल्याने मृतदेहांची ओळख पटवणे अवघड झाले आहे.
पिरंगुट एमआयडीसी मधील उरवडे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आगीत कंपनीतील 37 पैकी 17 कामगार बेपत्ता होते. परंतु बेपत्ता असलेले सर्वच 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, आग लागलेल्या कंपनीत सॅनिटायझर बनवत असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुपारी अचानक आग लागल्याने बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली असून जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु असल्याचे समजते.
आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली असून, पौड पोलिस आणि संबंधित यंत्रणा आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. हजारो कामगार कामास येत असतात.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!