गोंडपिपरी: लाॕकडाऊन काळात धाबा ग्रामपंचायत सभागृहात चौकशीचा नावावर विस ते तिस जनांना बोलविण्यात आले.सभागृहात उपस्थित असलेल्यांपैकी अनेकजण विनामास्क होते.कुठलीच परवानगी न घेता पर्यवेक्षिकेने लोकांना बोलाविले.हा गंभीर प्रकार करणाऱ्या पर्यवेक्षिकेला केवळ पाचशे रूपयाचा दंड ठोठाविण्यात आला आहे.पंचायत समितीने केलेल्या या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
धाबा येथिल अंगणवाडी क्र.चार येथे पोषण आहार अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली.या प्रकरणाची चौकशी धाबा ग्रामपंचायतेत घेण्यात आली.चौकशीसाठी पर्यवेक्षिका ठेमस्कर यांनी ग्रामपंचायत परिसरातील महीला,बालकांना बोलाविले.या महीलांना मास्क देण्यात आले नाही.विशेष म्हणजे सभागृहात ज्या मुलांना बयान देण्यासाठी बोलाविले गेले त्या मुलांनाही विनामास्कच ठेवल्या गेले.माध्यमातून हा प्रकार पुढे आल्यानंतर पंचायत समिती गोंडपिपरीचे सवर्ग विकास अधिकारी यांनी दंडनात्क कार्यवाही आणि उपस्थितांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले.कोरोना नियमांची ऐसीतैसी करणाऱ्या या प्रकरणातील पर्यवेक्षिकेवर केवळ पाचशे रूपयाचा दंड ठोठावून पंचायत समितीने हात मोकळे केले आहे.पंचायत समितीने केलेली कार्यवाही संशयास्पद असल्याचा प्रतिक्रिया तालुक्यात उमटत आहेत.
पंचायत समितीने दिलेल्या आदेशानुसार पर्यवेक्षिकेकडून पाचशे रूपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
डोंगरे ,सचिव ग्रामपंचायत धाबा