गडचिरोली/चामोर्शी
ब्युरोचीफ प्रशांत शाहा
रेगडी येथील दिनेश सुकृ नरोटे याने आदिवासी प्रथे नुसार आपल्या प्रेमिकाला रीना पेका गोटा रा.कचलेर ता एटापल्ली या मुलीला पळवून आणला त्यानंतर आदिवासी समाजा नुसार मुलीचा घरी निरोप देण्यात आला.
त्यानंतर आज मुलीचे आई वडील व नातेवाहिक रेगडी येथे मुलाच्या घरी आले व आदिवासी समाजा नुसार न्याय पाळ पळला. परंतु न्याय मद्ये मुलीचे घरचे मुलीला बळजबरी आपल्या घरी परत नेण्याचा पर्यंत केले. त्याच वेळी प्रेमी युगल यांनी पोलीस मदत केंद्र रेगडी येथे धाव घेऊन पळाले.
या वेळी पोलीस मदत केंद्र येथील psi शिंब्रे साहेब यांनी दोनही परिवाराला समजावून वाद मिठवला व दोन्ही परिवाराची समजूत काढून दोघेही दाम्पत्याचे लग्न जुळवुन दिले.त्या बद्दल psi शिंब्रे साहेब यांचे दोन्ही दाम्पत्य,त्याचे नातेवाहिकानी आभार मानले.
या वेळी रेगडी येथील पत्रकार प्रशांत शाहा,समाज सेवक रवी दुधकोहरे,त मु अ सुरेशजी पावे,गाव भूमिया फाकरिजि नरोटे,नेवलुजी नरोटे, बंडुजी पदा, रैनू पोटावी व आदी नागरिक उपस्थित होते