रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अन्न व औषध विभागाने रंगेहात पकडल्यानंतर शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना काळाबाजाराप्रकरणी रात्री अटक करण्यात आली आहे. क्राईस्ट रुग्णालयातील या गैरप्रकारात डॉक्टरला मदत करणाऱ्या दोन नर्सेसला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. हा काळाबाजार करणाऱ्या एकूण पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे
Advertisements
सर्वप्रथम आशय उराडे आणि प्रदीप गणवीर या आरोपींना गांधी चौक जवळील पुगलीया गल्ली येथे काल दुपारच्या सुमारास अटक करण्यात आली. हे दोघेही प्रत्येकी २५ हजार रुपयाला इंजेक्शन विकणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली होती.