जंगल कामगार सह.संस्थेच्या पदच्युत सचिवाची मनमानी…#संस्थेचे रेकॉर्ड देण्यास टाळाटाळ…

0
230

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) धामनपेठ जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सचिवाला संचालक मंडळाच्या सभेत ठराव करून पदच्युत करण्यात आले ..संस्थेचे रेकॉर्ड देण्याची रीतसर नोटीस देऊनही ते रेकॉर्ड देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार संस्थेच्या अध्यक्षांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार सविस्तर असे की ,गोंडपिपरी येथील जंगल कामगार सहकारी संस्था (र नं 8371)तालुक्यातील सर्वात मोठी संस्था समजली जाते.या संस्थेच्या संचालकांची सभा 26एप्रिल रोजी पार पडली
सदर सभेत ठराव क्र 2नुसार सुमारे 25वर्षापासून सचिव म्हणून कार्य करणारे वासुदेवराव सातपुते यांच्यावर वयोवृद्ध झाल्याचा ,संस्थेच्या संचालकांना विश्वासात नं घेता मनमानी कारभार करत असल्याचा ठपका ठेवून त्यांना पदच्युत करण्यात आले .
संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती एम डी कुळमेथे यांनी यासंदर्भातला आदेश जारी करून संस्थेचे सारे रेकॉर्ड 29एप्रिल पर्यंत संस्थेच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करण्याचे या आदेशाने कळवले.
मात्र आतापर्यंत पदच्युत सचिवाने संस्थेचे रेकॉर्ड अध्यक्षाकडे सोपवले नसून अध्यक्षांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे .आता संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मंदाताई कुळमेथे यांनी सहाय्यक निबंधक गोंडपिपरी यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे .सदर तक्रारीची दखल घेऊन सहाय्यक निबंधक श्री धोटे यांनी पदच्युत सचिव सातपुते यांना त्वरित संस्थेचे रेकॉर्ड संस्थेच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करा ,अन्यथा संस्थेच्या नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल असे एका पत्राद्वारे त्यांना कळवण्यात आले आहे.
धामनपेठ जंगल कामगार सह.संस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेत रीतसर ठरावाद्वारे पदच्युत केल्यानंतरही वयोवृद्ध झालेले हे सचिव महाशय संस्था सोडायला का तयार होत नाहीत ? हा सवाल येथे उपस्थित केला जात आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here