Advertisements
Home गडचिरोली कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी आष्टी ग्रामपंचायतीचा पुढाकार...विलगीकरणाची व्यवस्था करणारी ठरली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत...

कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी आष्टी ग्रामपंचायतीचा पुढाकार…विलगीकरणाची व्यवस्था करणारी ठरली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत…

प्रशांत शाहा

Advertisements

चामोर्शी/आष्टी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता कोरोनाबधित रुग्णांच्या सेवेसाठी व कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी आष्टी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन एस.चंद्रा महाविद्यालयात पुरुषांसाठी तर सद्गुरू साईबाबा
विज्ञान महाविद्यालयात महिलांसाठी स्वतंत्र विलगिकरणाचीची व्यवस्था केली. ग्रामीण भागात कोरोनाने आपले पाय पसरले असून याचा वाढता प्रसार लक्षात घेता आष्टी ग्रामपंचायतीने विलगिकरण कक्षाची सोय करून स्थानिक नागरिकांना येणारी अडचण दूर केली
आष्टी परिसरात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गृहवीलगिकरणामुळे कुटूंबातील इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.परंतु विलगिकरणाची सोय तालुक्याचे ठिकाण असलेल्या चामोर्शी (मार्कण्डा देव) येथे असल्याने रुग्णांना अडचण येत होती
ही अडचण लक्षात घेऊन आष्टी ग्रामपंचायतीने विलगिकरणाची स्वतंत्र सोय केल्याने व या रुग्णांची दररोज डॉक्टरच्या देखरेखीखाली रुग्णांची तपासणी होत असल्याने व रुग्णांची प्रकृतीत बिघाड झाल्यास त्यास त्वरित जिल्हा कोविड केंद्रामध्ये नेण्याची व्यवस्था करण्यात आली
अशाप्रकारे विलगिकरणाची सोय करणारी ही गडचिरोली जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली असून या ग्रामपंचायतीच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्यतील इतर ग्रामपंचायतीने विलगिकरणाची व्यवस्था केल्यास तालुका व जिल्हा स्तरावरील विलगिकरण कक्षावरील भार हलका होऊ शकतो
व रुग्णांना येणाऱ्या दैनंदिन अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात.असे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी व येथील सरपंच सौ, बेबीताई बुरांडे यांनी सांगितले
आज आष्टी ग्रामपंचायतीमार्फत सुरू करण्यात आलेल्या विलगिकरण केंद्राला स्थानिक आमदार डॉ. देवराव होळी, चामोर्शी पंचायत समितीचे बीडीओ,आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री राठोड, पोलीस उपनिरीक्षक कांबळे मॅडम यांनी भेट देऊन कौतुक केले
व जिल्ह्यतील इतर ग्रामपंचायतीनी आष्टी ग्रामपंचायती चा आदर्श घ्यावा असे आमदार डॉ होळी यांनी प्रतिपादन केले.
यावेळी आष्टी ग्रामपंचायतीच्या वतीने येथील सामान्य रुग्णालयात 100 खाटांचे कोविड केअर सेंटर त्वरित मंजूर करावे जेणेकरून या परिसरातील रुग्णांची सोय होईल व ग्रामीण भागात कोरोना प्रसारास आळा बसेल. यावेळी आष्टी जिल्हा परिषदेच्या सदस्या रुपाली पंदीलवार , पंचायत समितीचे सदस्य आक्रेडिवार ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ बेबीताई बुरांडे, उपसरपंच सत्यशील डोर्लीगर ,माजी सरपंच व ग्रा.प. सदस्य राकेश बेलसरे,पोलीस पाटील विनोद खांडरे , ग्रा.प.सदस्य कपिल पाल, ग्रा.प.सदस्य संतोष बारापात्रे,ग्रा.प. सदस्य छोटू दुर्गे, युवा नेते, प्रकाश बोबाटे ग्रामसेवक श्री पंधरे स्थानिक डॉ ,नर्स व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

जुगल एस बोम्मनवार ह्या गडचिरोली जिल्हा भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) गडचिरोली:- ग्लोबल स्काॅलरश फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून राज्य स्तरीय भूषण पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व कृषी तथा उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी...

शासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक

प्रितम म.गग्गुरी (उपसंपादक) गडचिरोली : येथील जिल्हा परीषद कार्यालयात महीलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत महीला हि जिल्हा परीषद...

सीटी-१ पाठोपाठ आता टी-६ वाघिणीचे दहशत; वर्षभरात घेतले ५ बळी

प्रितम गग्गुरी (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी) गडचिरोली:- तालुक्यातील राजगाटा-कळमटोला परिसरात पाच जणांचे बळी घेणाऱ्या टी-६ या वाघिणीला पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

राजुरा मतदारसंघातील कोरपना महिला काँग्रेस ची शहर व तालुका आढावा बैठक

राजुरा: आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात आणि महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 1 डिसेंम्बर पंचशील भवन कोरपना इथे राजुरा...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!