Home चंद्रपूर गोंडपिंपरी गाेंडपिपरी चे उप विभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांनी सहाय्यक महसुल कर्मचारी...

गाेंडपिपरी चे उप विभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांनी सहाय्यक महसुल कर्मचारी सुनिल चांदेवार वर अकारण पाेलिसात केला खाेटा गुन्हा दाखल.. कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा चंद्रपूर जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेचा इशारा..

नागेश इटेकर / तालुका प्रतिनिधी

गाेंडपिपरी: चे उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांच्या कडे कुठलेही सबळ कारण नसतांना त्यांच्या कार्यालयातील सहाय्यक महसुल कर्मचारी सुनिल चांदेवार यांचे वर पाेलिसांत खाेटा गुन्हा दाखल केला असून सदर आरोप तथ्यहीन आहे असे महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना जिल्हा चंद्रपूर च्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दि. ५ मे ला संघटनेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातुन आरोप करण्यात आला आहे.

उप विभागीय अधिकारी डव्हळे यांचे कडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना उर्मट आणि बेशिस्त पणाची वागणुक मिळत होती.असे असुन ज्या कर्मचा-यावर अन्याय झाला त्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी मंगळवार दि.४ मे ला डव्हळे यांची भेट घेवून सदरहु प्रकरणा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबत सामंजस्यपणे समझाेता करण्यांचा आटाेकाट प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही.शेवटी उप विभागीय अधिकारी डव्हळे यांनी आपली भूमिका ठाम ठेवली.त्यांच्या अश्या हुकुमशाही वागणुकीमुळे महसुल कर्मचाऱ्यांत असंताेषाची लाट पसरली आहे. उप विभागीय अधिकारी डव्हळे यांच्या कडे बल्लारपूर विभागाचा मुख्यतः पदभार असून गोंडपीपरी विभागाचा अतिरिक्त कार्यभार त्यांचेवर आहे.त्यांनी सुनिल चांदेवार या कर्मचाऱ्यावर कर्तव्यावर कसूर करण्यात आल्याचे खोटे आरोप लावून पाेलिसात गुन्हा दाखल केल्यामुळे विशेषता गाेंडपिपरी व बल्हारपूर कर्मचारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसुन येत आहे.

सदरहु कारवाई डव्हळे. यांच्या बेशिस्त तथा उर्मटपणाच्या वागणुकीतुन केली असल्याचे जिल्हा महसुल विभागातील कर्मचारी वर्गात आता उघड उघड बाेलल्या जात आहे.सुनिल चांदेवार यांचे वरील पाेलिस गुन्हा रद्द करा व उप विभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे यांना तातडीने निलंबित करा अशी मागणी कर्मचारी वर्गांकडुन हाेवू लागली आहे.एकीकडे काेराेना सारख्या महाभयानक संकटात शासन आदेशानुसार १५ टक्केच कर्मचारी कार्यालयात हजर असणे बंधनकारक असताना देखील जीव धाेक्यात टाकुन पूर्णवेळ प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत.तर दूसरी कडे कर्मचा-यावर द्वेशापोटी विनाकारण कारवाया केल्या जात आहे.त्यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांचे मनाेबल खचेल यात शंका नाही.

उप विभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळेंवर योग्य चोकशी करून कारवाई करण्यात यावी अगर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यांचा इशारा जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेने एका पत्रकातुन दिला असुन आज जिल्ह्याभरातील महसुल कर्मचारी काळ्या फिती लावून डव्हळे यांनी केलेल्या कारवाईचा निषेध नाेंदविणार आहेत.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

गोंडपिपरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ.. कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

सकमुर गावामध्ये जंगली डुक्करांकडून माणसांवर होत आहेत हल्ले… निवेदन देऊनही वनविभागाचे दुर्लक्ष..

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकराच्या हैदोसामुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता...

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गोंडपिपरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ.. कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

सकमुर गावामध्ये जंगली डुक्करांकडून माणसांवर होत आहेत हल्ले… निवेदन देऊनही वनविभागाचे दुर्लक्ष..

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकराच्या हैदोसामुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता...

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील,...

Recent Comments

Don`t copy text!