गडचिरोली जिल्ह्यात पोलीस व नक्षलवाद्यामध्ये चकमक; चकमकीत दोन नक्षलवादी ठार…#पोलीस मदतकेंद्र गट्टा हद्दीतील घटना…

0
896

विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा
एटापल्ली: एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र गट्टा अंतर्गत झारेवाडा गोरगुट्टा जंगल परिसरात आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले असल्याची माहिती प्राप्त झाली असून पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
पोलिसांना गुप्त सूचनेच्या आधारावर या परिसरात नक्षलवाद्यांचे वास्तव्य असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली. हे शोध मोहीम राबवित असताना आज सकाळी सात ते सव्वा सात वाजताच्या दरम्यान गोरगुट्टा जंगलात असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस अभियान पथकाची चाहूल लागताच गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने मारा केला. ही चकमक जवळ जवळ अर्धा तास चालली होती. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. चकमकीनंतर पोलिसांनी परिसराचा शोध घेतला असता, त्यांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांची शोधमोहीम अजुनही सुरू असून परिसरात तीव्र शोध मोहीम घेतल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here