बिग ब्रेकिंग! १५ मे पर्यंत वाढला राज्यातील लॉकडाऊन…

4854

मुबई : राज्यात 1 मे पर्यंत लागू असलेल्या लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मे नंतर पुढील 15 दिवस हे लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो, असा तज्ञांनी सल्ला दिला होता.