HomeBreaking Newsअंगावरची हळद उतरली नाही आणि काळाने तिचा घात केला...#अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी...

अंगावरची हळद उतरली नाही आणि काळाने तिचा घात केला…#अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी…

नागेश इटेकर / प्रतिनिधी

गोंडपिपरी : शहरातील इंदिरानगर भागातिल रहिवाशी मोरेश्वर मशाखेत्री यांचा लहान मुलगा शंकर याचे वीस दिवसा अगोदर गडचिरोली जिल्ह्यातील पारडी या गावातील राणी नावाच्या मुलीशी दिनांक ८/४/२०२१रोजी विवाह झाला.

विवाहाच्या रेशीम बंधनात अडकून त्यांनी संसाराचा गोडवा अनुभवायला सुरूवात केली.लग्न होऊन वीस दिवस लोटले नाही,अश्यात त्या नवविवाहित जोडप्यांना कुणाची तरी नजर लागली.लग्नाच्या काही दिवसातच शंकरच्या पत्नीच्या प्रकृतीत बिघाड झाला.त्याने तिला बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवले तरी प्रकृतीत सुधारणा होत नव्हती शेवटी आई वडिलांच्या भेटीने तरी तिला बरे वाटेल या हेतूने तिला तिच्या माहेरी आणला डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषोधोपचार सुरूच होता,पण काळ कुणावर कसा, कधी आणि कुठे झेप घेणार सांगत येत नाही.अश्यात राणीच्या प्रकृतीत अस्वस्थता जाणवायला लागली आणि अकस्मात तिने शंकरचा हात सोडला तो पण कायमचा.

अंगावरची हळद उतरली नाही, संसाराचा गाडा ओढण्याच्या शर्यतीत, कोरोणाच्या प्रतिकूल परिस्थितीत आज बुधवार ला दुपारी तिने अखेरचा श्‍वास घेतला.तिच्या अश्या अकस्मात जाण्याने शंकर वर दुःखचा डोंगर कोसळला असून दोन्ही परिवार शोकाकुल परिस्थितीत आहेत.शंकरच्या पत्नीच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच त्यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!