राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाची उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत होणार तपासणी–दिशा समितीच्या बैठकीत एकमताने ठराव पारित…

334

गडचिरोली :- दि.3 मार्च
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली शहरातुन जाणाऱ्या चारही मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम गेल्या दोन वर्षापासून प्रगती पथावर आहेत मात्र अनेक ठिकाणी महामार्गाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने व याबाबत अनेकांच्या तक्रारी असल्याने सदर रस्त्याच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली असून त्या समिती द्वारे महामार्ग कामाच्या दर्जाची तपासणी करण्याचा ठराव दिशा समितीच्या बैठकीत एकमताने पारित करण्यात आला. व सदर चौकशी समितीने यथाशिग्र निःपक्षपाती पणे चौकशी करून अहवाल सादर करावा असे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.
यावेळी शेतकऱ्यांचे लॉकडाऊन काळातील विजबिले व कृषी पंपाची बिले भरण्यासाठी त्यांना सवलत देण्यात यावी, तसेच कोणाचेही कनेक्शन कापण्यात येऊ नये व बिलाअभावी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पुर्ववत सुरू करण्यात यावा असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी महावितरण चे प्रभारी अधीक्षक अभियंता यांना दिले. तसेच शौचालय व घरकुलासाठी नागरिकांना रेती आणण्याची परवानगी देण्यात यावी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतीना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी जल शुद्धीकरण सयंत्र बसविण्याची व्यवस्था करण्यात यावी, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी व अन्य पदे तातडीने भरण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात यावी असे निर्देशही यावेळी खासदार अशोक नेते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
केंद्र शासन पुरस्कृत जिल्हा विकास, समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची महत्वपुर्ण आढावा बैठक आज दि. 3 मार्च 2021 रोजी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. श्री अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली.
या बैठकीला दिशा समितीचे सदस्य तथा भाजपचे ज्येष्ठ नेते मा बाबुरावजी कोहळे, अनुसूचित जनजाती मोर्चा चे प्रदेश संघटन महामंत्री तथा दाशा समीती जिल्हासदस्य प्रकाशजी गेडाम, गडचिरोली च्या नगराध्यक्ष मा योगीताताई पिपरे, समितीच्या सदस्या तथा जिप सदस्य लताताई पुंघाटे, समितीचे सदस्य डी. के. मेश्राम, दिशा समितीचे सदस्य तथा जिप चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा पोलिस अधीक्षक मा अंकित गोयल सर, उपजिल्हाधिकारी सोंनप्पा येनगार, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, उपविभागीय अधिकारी येरेकर, प्रकल्प संचालक कुमरे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मिश्रा, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर झोनचे उपमुख्य अभियंता तसेच सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख, सर्व बँकाचे व्यवस्थापक, विभाग प्रमुख, अधिकारी, उपस्थित होते. विद्युत,कृषी पंप, घरकुल,पिण्याचे शुद्ध पाणी व आरोग्याच्या प्रश्नांवर गाजली दिशा समितीची बैठक….