रेगडी येथील बीएसएनएलच्या थ्रीजी सेवेचे लपंडावमुळे नागरिक त्रस्त…

478

विदर्भ ब्युरोचिप प्रशांत शाहा
गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथे अवघ्या काही दिवसा अगोदर BANL ची थ्रीजी सेवा सुरू झाली असून ही सेवा नियमित नसल्याने रेगडी सह परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे.
सध्या इतर कंपनीचे रिचार्जे महाग असल्यामुळे अनेक गोरगरीब नागरिक व ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थी सूध्दा BSNL चा रिचार्जे कमी किमतीत मिळत असल्याने रिचार्जे करून नेट वापरत आहेत.
परंतु BSNL ची थ्रीजी सेवा दिवसात अनेक दा बंद होत असल्याने विध्यार्थी सह संपूर्ण परिसरातील नागरीकांना याचा भुर्दंड बसत आहे. या कडे BSNL चे वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन सेवा सुरळित करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांन कडून केली जात आहे.