Advertisements
सिंदेवाही :येथील जुना बसस्टँडवर एस टी बस ला शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाली. परंतू बस चालक पत्रु दडमल यांच्या समयसुचकतेने थोडक्यात दुर्घटना टळली.
Advertisements
बस क्रमांक एमएच 40 एन 9330 चंद्रपूर येथून ब्रम्हपुरी येथे प्रवास करीत होती. सिंदेवाही जुना बसस्टैन्डवर एसटीला शॉर्ट सर्किटने आग लागून धुवा निघत असल्याचे लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. प्रवासी आणि चालकाच्या सतर्कतेने अनेकांचे प्राण वाचले. बस च्या मागील दरवाजा मधून नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढून बस ची आग विझविण्यात आली. सदर बस ब्रम्हपुरी डेपोची असून ती चंद्रपूर ते ब्रम्हपुरी प्रवास करीत होती.
Advertisements
Advertisements