लॉकडाऊनच्या भीतीने परराज्यात रोजगारासाठी गेलेले मजूर परतीच्या मार्गावर..

763

प्रतिनिधी बंटी गेडाम
आष्टी: कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढण्यास प्रारंभ झाल्यानंतर मिरची तोडाई करीता परराज्य तेलंगाणा येथे गेलेले मजुरांनी अर्धवट काम सोडून पुन्हा लॉकडाऊन ”
या भीतीमुळे स्वागवाची आस लागल्याने मिळेल त्या वाहनाणे जस्थे च्या तसे गावाकडे रवाना झाले आहेत.

मागील वर्षी २०२० मध्ये याच महिन्यात गावाकडे जाण्यास किती हाल व निष्ठा सहन कराव्या लागल्यात याचे ते स्वतः साक्षीदार असल्याने आता ती पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी हे पूर्व तयारी केल्याचे दिसून येत आहे.

गडचिरोली जिल्ह्यतील हजारो नागरिक मिरची व कापूस तोडणीच्या हंगामासाठी व स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या अभावामुळे नजीक तेलंगाणा व अन्य राज्यात जात असतात मात्र कोविड १९ च्या मागील वर्ष्याच्या अनुभवानंतर यावर्षात सुद्धा महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी महिन्यात वाढते रुग्ण पाहून राज्य सीमा बँद होतील या अडचणीत सापडून आपले काम अर्धवट सोडून मजूर स्वगावास येण्यासाठी मिळेल त्या वाहनाने प्रवास करून आपले स्वगृही परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

स्थानिक पातळीवर मजुरांना पुरेशी कामे मिळत नसल्याने दरवर्षी मजुरांच्या नशिबी हालअपेष्टा येत असतात. त्यामुळे आता गावी परत आलेल्या मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी मजुरांनी केली आहे.