गट्टा -पेंढारी जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासासाठी पुढे या -आमदार डॉ देवरावजी होळी…

0
126
Advertisements

गडचिरोली-अनेक वर्षापासून मागास म्हणून ओळख असलेल्या गट्टा -पेंढरी जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासासाठी या क्षेत्रातील तरुणांनी पुढे यावे व केंद्र सरकारच्या जन कल्याणकारी योजनांची माहिती गावागावात जावून त्याचा स्थानिकांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव जी होळी यांनी गट्टा -पेंढरी जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासासाठी निवेदन देणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना केले.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास सबका विश्वास या धोरणाचा अवलंब करून या क्षेत्रातील लोकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करावे, सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत सर्वाँना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, आरोग्याच्या दृष्टीने असणाऱ्या योजनांची माहिती देवून आयुष्यमान भारत योजनेविषयी सर्वाँना माहिती देवून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा गावातील वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1करने , वनहक्क पट्टे असोत वा त्यातून होणारी धान खरेदी असो याविषयी गावांगावात जावून माहिती द्यावी असे आवाहन केले

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here