गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत…

0
91
Advertisements

प्रतिनिधी बंटी गेडाम
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एक एतिहासिक गोष्ट घडून आली आहे. धानोरा तालुक्यातील *मोहोगाव* येथे ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा फेब्रुवारी २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांची ही शाळा गोंडी बोलीतून आदीवासी विद्यार्थाना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारे केंद्र ठरणार आहे.

शाळेत रुकता उसेंडी ही विज्ञान राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रीना आतला ही विध्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे देणार आहे. पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल या नावाने धानोरा तालुक्यातील मोहोगाव येथे संविधानातील पाचव्या अनुसुचीतील २४४ (१) ३५० (क) आणि १३ (३) (क) या कलमामधील तरतुदीनुसार देवराव मंडब् ग्रामसभेला अधिकाऱ्यांनव्ये ही शाळा सुरू करण्यात आली.

Advertisements

या शाळेचे उदघाटन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी व गोंडी समाज सेवक गणेश हलामी देवसाय पाटील आतला उपस्थिती होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here