येणापुर येथील भव्य रक्तदान शिबीराला युवकांचा प्रतिसाद; जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

0
130
Advertisements

प्रतिनिधी : बंटी गेडाम
काल 20/02/2021 रोज शनिवार ला नेहरू युवा केंद्र गडचिरोली संलग्नित स्वामी विवेकानंद युवा मंडळ विठ्ठलपूर व जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येणापुर यांच्या वतीने शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्धघाटक मा. प्रकाश भाऊ गेडाम, प्रदेश सरचिटणीस भा.अनु.ज.मो., तसेच सहउद्धघाटक स्वप्नील भाऊ वरघंटे, प्रदेश सदस्य, भा.यु.मो., आणि अध्यक्ष मनमोहन बंडावार,माजी उपसभापती चामोर्शी, प्रा. गिरीष तुम्पलीवार सर, सौ. सुनीताताई मोहन बंडावार, शामराव जक्कुलवार, सुरेश गुंतीवार, उपस्थित होते.
रक्तदान करतांना आकाश बंडावार, धनराज,अविनाश पुच्छलवार, डॉ. प्रल्हाद सरकार, सोनू, राकेश झराते, बिरबल सरकार, कपिल बंडावार, संतोष मेकलवार, सचिन आत्राम, अविनाश दुधे, विजय मंडल, प्रवीण अलनमकार, दिनेश रामटेके, आकाश मेश्राम, संदीप गुंतीवार, निलेश वाकुडकर, लोमेश गेडाम,प्रमोद झरकर, रुपेश आत्राम, विश्वजित मंडल आदी युवकांनी रक्तदान केले
पंकज कुरवटकर (SSC JD consetebal ), विजय गाजुलवर (SSC JD consetebal ), मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजक वैभव बुरनवार, लुकेश सोमनकर, रवींद्र बंडावार, रवींद्र जक्कुलवार, बालाजी मदासवार, पंकज कुरवटकर, प्रशांत गावडे, चेतन दिवसे, शुभम निमगड, आकाश बंडावार, महेश बुरमवार, आयुष दुधे, आशिष चलाख, माणशी राऊत, इशिका देठेकर, केतकी गेडाम, रिटा पुच्छलवार, तथा आरोग्य पथक डाँक्टर, कर्मचारी, आणि रक्त संक्रमण टीम गडचिरोलीचे सतीश सर व संपूर्ण टीम यांनी रक्त संकलीत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गावडे, प्रास्ताविक रवींद्र बंडावार तर आभार लुकेश सोमनकर यांनी केले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here