ब्रेकिंग! दुचाकीच्या समोरासमोर धडक तीन ठार दोन गंभीर…

0
2558

प्रतिनिधी : बंटी गेडाम
सिरोंचा : दोन दुचाकींची समोरासमोर धडक झालेल्या अपघातात तीन झन ठार तर दोन झन जखमी झाल्याची घटना काल शनिवार २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सिरोंचा तेलंगाणाला जोडणाऱ्या प्राणहिता नदीपुलापासून १०० मीटर अंतरावर घडली अपघाची माहिती मिळताच सिरोंचा व तेलंगाणा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी तेलंगाणा राज्यातील चेंनूर येथे भरती केले प्रसाद नारायण परसा (२६) रेवंत प्रकाश मुदमडगेला (२१) रा सिरोंचा सुमन चला रा अंकीसा ता सिरोंचा अशी मृतकाची नावे आहेत तर रवी सल्ला नितीन जकुल्ल अशी जखमींची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार प्रसाद व रेवंत हे दोघे जण दुचाकीद्वारे टेलफॅन राज्यातील चेंनूर येथून सिरोंचाकडे येत होते तर रवी नितीन व अन्य एक व्यक्ती दुचाकीने सिरोंचावरून चेन्नर येथे जात होते दरम्यान तेलंगाणा सिरोंचा सीमेवर असलेल्या प्राणहिता नदिपुलावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक बसली यामध्ये दोन्ही दुचाकीवरील पाचही झन गंभीर होऊन रस्त्यावर पडले धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही दुचाकी क्षतीग्रस्त झाल्या अपघाताची माहिती मिळताच सिरोंचाचे पोलीस निरीक्षक अजय अहिरकर पोलीस उपनिरीक्षक धनराज सोलोकर मुंडे बांदेकर रामू सवला यांनी घटना स्थळी धाव घेतली तर तेलंगाणा राज्यातील कोटपल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. नागराज पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले दोन्ही राज्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला यादरम्यान जखमीपैकी प्रसाद परसा सुमन सल्ला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता तर रवी रेवंत व नितीन या गंभीर जखमींना तेलंगाणा राज्यातील चेंनूर येथील रुग्णालयात नेत असतांना रेवंत याचा वाटेतच मृत्यू झाला गंभीर जखमी रवी व नितीन यांच्यावर चेंनुर येथील उपचार सुरू आहेत एमएच ३३ एक्स ९३८३ व एम एच ३३ आर ३९६५ असे दोन्ही अपघातग्रस्त राज्याच्या हद्दीत येत असून कोटपल्ली पोलीस स्टॅशन अंतर्गत येते … पुढील तपास कोटपल्लीचे पोलीस निरीक्षक के. नागराजू करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here