राजुरा वनपर्यटन शेतक-यांच्या मानगुटीवर….

0
164

बल्लारपूर : राजुरा मध्यचांदा वनविभागाच्या राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात आर.टी-१ वाघाच्या हल्ल्यात दहा शेतमजूर आणि शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. ८ ते ९ महिन्यानंतर वाघाला जेरबंद केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असतानाच आता वनविभागाने राजुरा वनपरिक्षेत्रातील जवळपास १० हजार हेक्टर वनक्षेत्रात पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या जंगल सफारीमुळे वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात येण्याची भिती असून, वन्यप्राणी शेतशिवाराकडे वळण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे भविष्यात मानव व प्राणी संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, वनपर्यटनामुळे शेतक-्यांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला आहे.
राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रात आर.टी. १ वाघाने थैमान माजवत जंगलासह शेतशिवारात दहा शेतकरी, शेतमजुरांना ठार केले होते. १६ जानेवारी २०१९ ते ५ ऑक्टोबर २०२० या दोन वर्षात वाघाने वर्षा तोडासे, नंदकिशोर बोबडे, श्रीहरी साळवे, मंगेश कोडापे, संतोष खामनकर, उद्धव टेकाम, दिनकर ठोंबरे, वासुदेव कोंडेकर, गोविंदा मडावी, मारोती पेंदोर या दहा शेतकरी व शेतमजुरांच्या नरडीचा घोट घेतला आहे. दोन्ही वनपरिक्षेत्रातील खांबाडा, मूर्ती, धानोरा, चुनाळा, नवेगाव, यासह परसोडी जंगलात वाघाची दहशत पहायला मिळाली होती

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here