अमीत येनप्रेड्डीवार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड

347

नितेश खडसे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली: सुचना का अधिकार कार्यकर्ता असोसिएशन पंजिकृत माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष श्री साईनाथ नागनाथ शिंदे यांचा तर्फे आलापल्ली येथील अमीत राजू येनप्रेड्डीवार यांचे माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्या नक्षलग्रस्त अतिदृगम क्षेत्रांनी व्यापलेला आहे अनेक अतिसंवेदनशील क्षेत्र आहे जिथे माहिती अधिकार अधिनियम कायद्याच्या अपूर्ण माहिती आणी अभ्यास नसल्याकारणाने अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनात भ्रष्टाचारी लोकांचे बळी पडत आहे याच गोष्टीची दखल घेत माहिती अधिकार अधिनियम कायद्याचे प्रचार प्रसार करून नागरिकांना कायद्या विषयी जागरूक करण्या करीता अतिशय प्रामाणिक सक्षम अश्या आलापल्ली येथील अमीत येनप्रेड्डीवार यांचे माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आले आहे.